मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  टॉयलेट क्लिनर टाकून विकायचा पाणीपुरी; आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

टॉयलेट क्लिनर टाकून विकायचा पाणीपुरी; आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 20, 2022 03:29 PM IST

गेल्या काही वर्षांमध्ये पाणीपुरी विक्रेते पाणीपुरीत भेसळ करत असल्याचा प्रकार समोर आले आहेत. असाच काहीसा किळसवाणा आणि विचित्र प्रकार गुजरातमध्ये घडला आहे.

Panipuri Seller Jailed For Mixing Toilet Cleaner In Panipuri
Panipuri Seller Jailed For Mixing Toilet Cleaner In Panipuri (HT)

Panipuri Seller Jailed For Mixing Toilet Cleaner In Panipuri : अनेक लोकांना विशेषत: महिला आणि मुलींना पाणीपुरी खायला फार आवडतं. त्यात तिखट आणि मिडियम पाणीपुरी खाण्याची अनेक लोकांची मागणी असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरीच्या सामग्रीमध्ये काही विक्रेते घातक आणि धोकादायक पदार्थ मिसळवत असल्याचे प्रकार घडलेले आहेत. असाच काहीसा प्रकार हा गुजरातमधील अहमदाबादेत घडला आहे, एका पाणीपुरी विक्रेत्यानं पाणीपुरीत चक्क टॉयलेट क्लिनर मिसळल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं संबंधित विक्रेत्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये एका पाणीपुरी विक्रेत्यानं पाणीपुरीत टॉयलेट क्लिनर मिसळल्यानं मोठी खळबळ उडाली होती. अहमदाबादच्या लाल दरवाजा परिसरातील एक विक्रेता पाणीपुरीची टेस्ट वाढावी म्हणून त्यात टॉयलट क्लिनरचा वापर करत होता, त्यानंतर त्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तो दोषी आढळल्यानंतर विक्रेत्याला न्यायालयानं सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती.

पाणीपुरीत मिसळायचा अॅसिड...

अहमदाबादेतील पाणीपुरी विक्रेत्याविरोधात तक्रार केल्यानंतर त्याच्या पाणीपुरीची सामग्री ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. त्यात तो पाणीपुरीत अॅसिड मिसळवत होता, जो टॉयलेट क्लिनरसाठी वापरण्यात येत होतं. त्यामुळं त्याला न्यायालयानं कठोर शिक्षा सुनावली होती.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

या किळसवाण्या घटनेची माहिती मिळताच काही नागरिकांनी एकत्र येत या विक्रेत्याला पाणीपुरीतील सामग्रीविषयी जाब विचारला, तेव्हा पाणीपुरीत त्याच्याकडं टॉयलेट क्लिनरसाठी वापरण्यात येणारं अॅसिड सापडलं. यानंतर काही लोकांना याची तक्रार पोलिसांकडे केल्यानं पोलिसांनी पाणीपुरी विक्रेत्याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती.

पाणीपुरीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी?

असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील कोल्हापूरात २०२० मध्ये घडला होता. एक पाणीपुरी विक्रेता पाणीपुरी तयार करण्यासाठी चक्क शौचालयातील पाणी वापरत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या