Paneer Gravy: रेस्टॉरंटच्या पनीर ग्रेव्हीमध्ये काय असतं वेगळं? इथे आहे सेम टू सेम रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Gravy: रेस्टॉरंटच्या पनीर ग्रेव्हीमध्ये काय असतं वेगळं? इथे आहे सेम टू सेम रेसिपी

Paneer Gravy: रेस्टॉरंटच्या पनीर ग्रेव्हीमध्ये काय असतं वेगळं? इथे आहे सेम टू सेम रेसिपी

Published Oct 13, 2024 01:24 PM IST

Hotel Like Paneer Vegetables: घरातले सगळेच म्हणतात की पनीर रेस्टॉरंटसारखं हवंय. आता तुम्हाला माहितेय का रेस्टॉरंट्स त्यांच्या भाजीमध्ये कोणती विशेष गोष्ट घालतात ज्यामुळे ती इतकी चवदार होते?

Restaurant Like Paneer Gravy
Restaurant Like Paneer Gravy (freepik)

Restaurant Like Paneer Gravy: प्रत्येकजण पनीर आवडीने खातात. तुम्ही ते कोणत्याही पार्टीत किंवा घरी केव्हाही तयार करून खाऊ शकता, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला घरच्या साध्या जेवणातही रेस्टॉरंटची चव नेहमीच हवी असते. तुमचा नवरा असो की मुलं, घरातले सगळेच म्हणतात की पनीर रेस्टॉरंटसारखं हवंय. आता तुम्हाला माहितेय का रेस्टॉरंट्स त्यांच्या भाजीमध्ये कोणती विशेष गोष्ट घालतात ज्यामुळे ती इतकी चवदार होते? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, त्यांची ग्रेव्ही ही आपल्यापेक्षा वेगळी असते. अनेक शाकाहारी आणि मांसाहारी भाज्या आहेत ज्यांची ग्रेव्ही सारखीच असते. ही ग्रेव्हीच कोणत्याही भाजीची चव वाढवते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पनीरची भाजी घरीच बनवणार असाल तर त्यासाठी खास ग्रेव्ही बनवली तर तुमची भाजी आपोआपच रुचकर होईल. या ग्रेव्हीसोबत पनीर खाल्ल्याबरोबर प्रत्येकजण तुमचं कौतुक करायला लागेल. आज आपण या ग्रेव्हीची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

 

पनीर ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य-

पनीर - २०० ग्रॅम

काजू- ६ ते ७

टोमॅटो - २ (प्युरी)

कांदा - १ (बारीक चिरलेला)

आले लसूण पेस्ट - १ टीस्पून

ग्रेव्हीसाठी लागणारे मसाले-

छोटी वेलची- १

मोठी वेलची- १

लवंगा - २

जावित्री -१ लहान तुकडा

दालचिनी - १ लहान तुकडा

तमालपत्र - १

धनिया पावडर - १ टीस्पून

गरम मसाला- १/२ टीस्पून

कसुरी मेथी - थोडीशी

लाल मिरची पावडर - १/२ टीस्पून किंवा चवीनुसार

मीठ - चवीनुसार

तेल - २ चमचे

महत्वाची टीप- ग्रेव्ही बनवण्यापूर्वी अर्धा कप गरम पाण्यात काजू भिजवा. १० मिनिटांनंतर गरम पाण्यात भिजवलेले काजू मिक्सरमध्ये टाकून बारीक करून पेस्ट बनवा.

पनीर ग्रेव्ही रेसिपी-

पनीर ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम एक तवा घ्या, त्यात तेल घाला, तेल गरम झाल्यावर त्यात सर्व मसाले घाला. मसाले सुगंध सुटेपर्यंत चांगले लालसर भाजून घ्या. आता त्यात कांदा घालून चांगला परतून घ्या. कांदा तपकिरी रंगाचा होऊ लागला की त्यात आले आणि लसूण पेस्ट घालून एकत्र परतून घ्या. आता आले आणि लसूण कांद्यामध्ये चांगले मिसळू लागल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घाला.

नंतर त्यात मीठ घालून चांगले शिजवून घ्या.

हे मिश्रण अगदी तेल सुटेपर्यंत शिजवा. नंतर त्यात तिखट आणि धनेपूड घाला.मग काजूची पेस्ट घालून आणखी १ मिनिट परतून घ्या. या सर्व मिश्रणासह पेस्ट भाजायला लागल्यावर त्यात पाणी घाला. ग्रेव्ही जास्त पातळ होणार नाही म्हणून काळजीपूर्वक पाणी घाला. पाणी टाकल्यावर वर गरम मसाला आणि कसुरी मेथी घाला. भाजीत कसुरी मेथी घालण्यापूर्वी ती तळहातावर बारीक घासून घ्या. त्यामुळे त्याचे पावडरमध्ये रूपांतर होईल आणि भाजीला चवही चांगली येईल. आता त्यात चिरलेले पनीरचे तुकडे टाका आणि ५ मिनिटे ग्रेव्ही बरोबर शिजवा. अशाप्रकारे तुमची रेस्टोरंटसारखी पनीर ग्रेव्ही तयार आहे.

 

Whats_app_banner