Palak Ka Saag Recipe In Marathi : पालकाची चव कशीही असली तरी, तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे कधीच नाकारता येत नाही. हिवाळ्यात ताज्या पालकापासून अनेक गोष्टी तयार करता येतात. योग्य वाढीसाठी शरीराचे पोषण करणेही आवश्यक आहे. पालकमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे मुलांच्या हाडांचा विकास आणि मजबुतीकरण करण्यास मदत करते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिने असतात, पण तरीही मुलांना पालकाची भाजी खायला घालणे खूप अवघड असते. बहुतेक मुले ही भाजी पाहून तोंड वाकडं करतात. जर तुमची मुलेही ही भाजी पाहून नाक मुरडत असतील, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करावी.
ताजी पालकाची पाने
ताजी कोथिंबीर
लसूण पाकळ्या
एक वाटी दही
आल्याचे पातळ तुकडे
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेले टोमॅटो
आले-लसूण पेस्ट
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
जिरे
हळद
धणे पूड
गरम मसाला
लाल तिखट
तूप
मीठ
हिंग
> ‘पालक का साग’ ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक आणि हिरवी कोथिंबीर नीट धुवून घ्या.
> नंतर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात पालक घाला आणि नंतर १ ते २ मिनिटांनी हिरवी कोथिंबीर घाला.
> एका मिनिटानंतर ते पाणी गाळून घ्या आणि त्यावर थंड पाणी घाला.
> आता पालक आणि कोथिंबीर मिक्सरमधून नीट बारीक करून घ्या.
> आता एका कढईत तूप घाला आणि नंतर गरम झाल्यावर त्यात हिंग आणि जिरे घाला.
> फोडणी तडतडल्यावर त्यात चिरलेला लसूण घालून परतून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
> आता त्यात टोमॅटो आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात हळद, धणे पूड, लाल तिखट घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा.
> हे मसाल्याचे मिश्रण तेल सोडू लागल्यावर त्यात पालक प्युरी घाला.
> आता उकळी आल्यावर दही घाला आणि मग गरम मसाला आणि मीठ घाला.
> भाजी चांगली शिजू द्या आणि नंतर त्यावर लोणी आणि आल्याचे फ्लेक्स घालून गार्निश करा.
> ही भाजी गरमा गरम चपाती आणि भातासह सर्व्ह करा.
रक्तदाब नियंत्रण: पालकांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
हाडांसाठी फायदेशीर: व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम यांच्यामुळे हाडांची मजबुती वाढवते आणि हाडांची वाढ आणि पुनर्निर्मिती होण्यास मदत होते.
पचनास मदत: पालकात असलेले फायबर्स पाचन व्यवस्थेला सुधारतात, बद्धकोष्ठता कमी करतात आणि आतड्यांच्या आरोग्याला उत्तेजन देतात.
अँटीऑक्सिडेंट्सचे स्रोत: पालकात अँटीऑक्सिडेंट्स जसे की व्हिटॅमिन सी आणि फॅल्कोनोइड्स असतात, जे रॅडिकल्सला शरीराला हानी पोहोचवण्यापासून रोखतात आणि शरीरातील सूज आणि इन्फ्लेमेशन कमी करतात.
प्रोटीनचा स्त्रोत: पालकमध्ये प्रोटीनसुद्धा असते, ज्यामुळे शरीराच्या स्नायूंना बळकटी मिळते.