Weight Loss: काय सांगता! पाकिस्तानी अभिनेत्रीने चक्क ७ दिवसांत घटवलं ८ किलो वजन, काय आहे 'हा' क्रॅश डाएट?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: काय सांगता! पाकिस्तानी अभिनेत्रीने चक्क ७ दिवसांत घटवलं ८ किलो वजन, काय आहे 'हा' क्रॅश डाएट?

Weight Loss: काय सांगता! पाकिस्तानी अभिनेत्रीने चक्क ७ दिवसांत घटवलं ८ किलो वजन, काय आहे 'हा' क्रॅश डाएट?

Dec 17, 2024 04:01 PM IST

What Is Crash Diet In Marathi: एका मुलाखतीत निमराने तिच्या वजन कमी करण्याच्या अतिशय कठीण डाएटचा खुलासा करताना सांगितले की, "वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला आधी स्पष्ट उद्दिष्टे ठेवण्याची गरज आहे.

What does Nimra Khan do to lose weight
What does Nimra Khan do to lose weight (Instagram )

Nimra Khan weight loss Journey In Marathi:  पाकिस्तानी अभिनेत्री निमरा खानने अलीकडेच तिच्या प्रचंड वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. तिने अत्यंत क्रॅश डाएटद्वारे केवळ 7 दिवसांत 8 किलो वजन कसे कमी केले हे उघड केले आहे. पण तिने हे नक्की कसे साध्य केले आणि वजन कमी करण्याचा हा खरोखरच निरोगी किंवा टिकाऊ मार्ग आहे का? याबाबत आपण जाणून घेऊया.

निमरा खानने 7 दिवसात 8 किलो वजन कसे कमी केले?

एका मुलाखतीत निमराने तिच्या वजन कमी करण्याच्या अतिशय कठीण डाएटचा खुलासा करताना सांगितले की, "वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला आधी स्पष्ट उद्दिष्टे ठेवण्याची गरज आहे." तिने खुलासा केला की तिच्या आहारात फक्त अंड्याचा पांढरा भाग, सफरचंद, ग्रीन टी आणि पालेभाज्यांच्या ज्यूसचा समावेश आहे. कर्बोदके म्हणजेच कार्ब्स पूर्णपणे टाळत तिने आपले वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. याबाबत अभिनेत्री म्हणते की, “मी दर तीन तासांनी एक सफरचंद तीन अंडयांचा पांढरा भाग आणि दर दोन तासांनी ग्रीन टी. ही दिनचर्या सात दिवस सकाळ, दुपार आणि संध्याकाळी पुनरावृत्ती केली.”

निमराने प्रत्येक दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात मध, लिंबू आणि चिया सीड्स मिसळून करण्याचा उल्लेख केला आहे. शिवाय तिने नमूद केले आहे की, "ही 7 दिवसांची आहार योजना होती, आणि कोणीही ती 4 दिवसांपेक्षा जास्त काळ पूर्ण केलेली नाही. बहुतेक लोक पहिल्या 3 दिवसात सातत्य ठेवतात परंतु चौथ्या दिवशी ते सोडून देतात. इतकी कठीण डाएट अनेकांना जमणे शक्य नाही''.

वजन कमी करण्याचा क्रॅश डाएट हा योग्य मार्ग आहे का?

निमराची पद्धत जलद परिणाम देऊ शकते, परंतु वजन कमी करण्यासाठी तो शाश्वत किंवा निरोगी दृष्टीकोन आहे का याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. होली फॅमिली हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ञ लीना मार्टिन यांनी एचटी लाईफस्टाईलशी आपले याबाबतचजे मत मांडत सांगितले की, "अशा क्रॅश डाएटमुळे चरबी कमी होण्याऐवजी पाण्याचे वजन म्हणजेच वोटर वेटकमी होते. त्यामुळे हार्मोनल असंतुलन, केस गळणे, त्वचेच्या समस्या यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. , आणि पोषक तत्वांची कमतरता या व्यतिरिक्त, कार्बोहायड्रेट्स पुन्हा घेतल्यांनंतर कमी केलेले वजन लवकर परत येण्याची शक्यता असते, ज्यामुळे परिणाम राखणे आव्हानात्मक होते.

तज्ज्ञ पुढे म्हणाली, "आरोग्यदायी आणि अधिक चिरस्थायी परिणामांसाठी, सर्व अन्न गट, नियमित व्यायाम आणि हळूहळू जीवनशैलीतील बदल यांचा समावेश असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक किंवा आहारतज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय अत्यंत कमी आहार टाळावा. क्रॅश डाएटच्या धोक्यांमध्ये खराब पोषण, संप्रेरक बदल, पित्ताशयाचे खडे आणि अगदी मूड स्विंग यांचा समावेश होतो." त्यामुळे अगदी क्रॅश डाएट निरोगी नाही.

Whats_app_banner