मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care: ओल्या की कोरड्या कोणत्या प्रकारच्या केसांवर लावायचा कोरफडीचा गर?

Hair Care: ओल्या की कोरड्या कोणत्या प्रकारच्या केसांवर लावायचा कोरफडीचा गर?

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
May 26, 2023 01:52 PM IST

Aloe Vera for Hair Care: कोरफडीचा गर किंवा जेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते नक्की कधी लावायचं ते जाणून घेणे गरजेचं आहे.

हेअर केअर
हेअर केअर (Freepik )

Aloe vera benefits for hair: कोरफड आरोग्यासाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्वचेची समस्या असो किंवा केसगळती रोखण्यासाठी, कोरफडीचा गर नेहमीच उपयोगी पडतो. केसांना पुरेसे पोषण देण्यासोबतच कोरफडीचे जेल केसांसाठी कंडिशनर म्हणूनही काम करते. पण केसांना कोरफडीचा गर कसा लावायचा याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. काही लोक ओल्या केसांना लावतात तर काही कोरड्या केसांमध्ये. जर तुम्हालाही केसांमध्ये कोरफडीचा गर लावण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर या लेखातून जाणून घ्या.

ही आहे योग्य पद्धत

कोरड्या केसांनावर कोरफडीचे जेल लावावे. ओल्या केसांना लावल्यावर त्यातील ओलावा केसांच्या पाण्याबरोबर सुकतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही कोरफडीचा जेल लावा तेव्हा तो नेहमी कोरड्या केसांवरच लावा.

कसं लावायचं हे तेल?

कोरफडीचा गर एका भांड्यात घ्या, बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांवर आणि केसांच्या संपूर्ण लांबीवर म्हणजे शेवटपर्यंत लावा. यानंतर अर्धा तास सोडा. अर्ध्या तासानंतर केस चांगल्या शॅम्पूने धुवा.

किती वेळा लावावा?

कोरफडीचा गर आठवड्यातून दोनदा केसांना लावता येते. हे उत्कृष्ट कंडिशनिंग आणि स्मूथिंगचे काम करते. ते लावल्यानंतर नेहमी सौम्य शँम्पू वापरा. तुम्ही कोरफडीचा गर इतर गोष्टींसोबत मिसळूनही लावू शकता. तुम्ही त्यात खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल टाकून केसांना लावू शकता. यामुळे तुमच्या केसांना पूर्ण पोषणही मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग