मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ukadiche Modak Recipe: माघी गणेश जयंतीनिमित्त 'असे' बनवा उकडीचे परफेक्ट मोदक!
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक (Freepik )

Ukadiche Modak Recipe: माघी गणेश जयंतीनिमित्त 'असे' बनवा उकडीचे परफेक्ट मोदक!

25 January 2023, 9:35 ISTTejashree Tanaji Gaikwad

Maghi Ganesh Jayanti: माघी गणेश जयंतीनिमित्त घरी बनवा परफेक्ट उकडीचे मोदक. योग्य रेसिपी फॉलो केल्यास एकदं बेस्ट उकडीचे मोदक तयार होऊ शकतात.

How to make ukadiche modak: आज माघी गणेश जयंतीनिमित्त घरोघरी गणराय विराजमान झाले आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात. श्रीगणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात. मोदक चवीने परिपूर्ण असतात जे सहसा खास प्रसंगी गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करण्यासाठी बनवले जातात. मोदकांचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत आणि उकडीचे मोदक देखील त्यापैकी एक आहे. मोदक दोन प्रकारे बनवता येतात. एक मार्ग तळून आणि दुसरा उकडून. उकडीचे मोदक बनवायचं म्हंटल की लोकांना चुकायची भीती वाटते. पण योग्य रेसिपी फॉलो केल्यास एकदं बेस्ट उकडीचे मोदक तयार होऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

उकडीचे मोदक फार कमी वेळात तयार होतात. ते तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, खोबरे असं साहित्य वापरले जातात. चला जाणून घेऊया उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.

उकडीचे मोदक बनवण्याचे साहित्य

तांदळाचे पीठ - २ वाट्या

किसलेले नारळ - २ कप

गूळ - १ कप

देसी तूप - २ टीस्पून

वेलची पावडर - १/२ टीस्पून

मीठ - १/२ टीस्पून

उकडीचे मोदक कसे बनवायचे?

> उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात १ चमचा देशी तूप गरम करून त्यात २ वाट्या खोबरे घालून परतून घ्या.

> नारळातून सुगंध यायला लागल्यावर त्यात ठेचलेला गूळ टाका आणि नीट मिक्स करून शिजवा.

> मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि नारळात मिसळेपर्यंत शिजवा.

> मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, नंतर वेलची पावडर घाला. मोदकाचे सारण तयार आहे.

> आता दुसरे पॅन घ्या आणि त्यात १ चमचा देशी तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळले की त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिसळा.

> आता त्यात २ कप पाणी टाकून उकळा. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा. तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत ते मिक्स करावे.

> आता गॅस बंद करून पीठ झाकून ५ मिनिटे बाजूला ठेवा. पीठ थोडे कोमट राहिल्यावर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नंतर पीठ मळून घ्या.

> पीठ पूर्णपणे मऊ होईपर्यंत मळून घ्या. आता मोदकासाठी पीठ तयार आहे.

> आता पिठाचे गोळे बनवा आणि एक गोळा घ्या, त्याचे गोल करा आणि नंतर ते चपटे करा. यानंतर, दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा. कपाचा आकार येईपर्यंत पीठाचे कोपरे हळू हळू दाबत रहा. मग त्यातून प्लीट्स बनवा. यानंतर मोदकात तयार गूळ-खोबऱ्याचे सारण चमच्याच्या साहाय्याने भरून प्लीट्स गोळा करून वरून दाबून बिंदूचा आकार द्या.

> अशाप्रकारे सगळे मोदक बनवून घ्या आणि त्यांना नंतर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या. चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत.

 

विभाग