Food to increase bone strength: तुम्हाला नेहमी थकवा आणि अशक्तपणा वाटतो का? तुम्हाला अशक्तपणाचा त्रास आहे का? तुमची हाडे कमकुवत झाली आहेत का? तुमचे शरीर अशक्त आहे का? जर होय, तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही सकस आहार घेत असाल, पण असे असूनही तुमचे शरीर कमकुवत असेल, तर शरीराला ताकत देणारे सर्व पोषक तत्व तुम्हाला मिळत नसण्याची शक्यता आहे. प्रथिने, लोह, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांची शरीराला बळकट करण्यासाठी आणि रोगांशी लढण्याची ताकद देण्यासाठी सर्वात जास्त गरज असते. जर तुम्हाला तुमच्या अन्नातून हे घटक मिळत नसतील तर तुमचे शरीर हळूहळू आतून अशक्त होत जाईल.
शारीरिक ताकदीसाठी काय खावे? जर तुम्हाला तुमचे शरीर मजबूत बनवायचे असेल आणि तुमची हाडे कॅल्शियमने भरून त्यांना लोहासारखे मजबूत बनवायचे असेल तर, आम्ही तुम्हाला एक खात्रीशीर देशी उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे शरीरातील लोह, कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता तर भरून निघेलच शिवाय तुमची कमजोरीसुद्धा दूर होईल. तर हा उपाय आहे काबुली चणे आणि गुळाचे पौष्टिक लाडू.
-१०० ग्रॅम भाजलेले काबुली चणे
-५० ग्रॅम मनुके
-१५० ग्रॅम गूळ
-५० ग्रॅम अक्रोडचे तुकडे
-५० ग्रॅम खरबूज बीचे तुकडे
-५० ग्रॅम शेंगदाण्याचे बी
- सर्वप्रथम घेतलेले सर्व पदार्थ देशी तुपात चांगले तळून घ्या.
-नंतर काबुली चणे मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर बनवा.
-उरलेले बाकीचे साहित्यही चांगले बारीक करून घ्या.
-हे सर्व मिश्रण एकत्र करून तुपाच्या साहाय्याने लाडू वळून घ्या.
-तयार केलेले हे लाडू तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता.
काबुली चणा आणि गुळापासून तयार केलेले हे लाडू तुम्ही दररोज एक खाऊ शकता. सकाळी दुधासोबत सेवन करणे चांगले. परंतु जास्त उष्ण असल्याने तुम्ही मुलांना दररोज अर्धा लाडू देऊ शकता. याचे सेवन केल्याने तुम्हाला अवघ्या १५ दिवसात तुमच्या शरीरात फरक जाणवू लागेल. हळूहळू तुमची हाडे मजबूत होऊन सर्व समस्या दूर होतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)