Calcium: फक्त दूधच नाही तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे पदार्थही करतात पूर्ण!-not only milk but these foods also fulfill the deficiency of calcium ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Calcium: फक्त दूधच नाही तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे पदार्थही करतात पूर्ण!

Calcium: फक्त दूधच नाही तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे पदार्थही करतात पूर्ण!

Mar 13, 2024 04:18 PM IST

Calcium Food : कॅल्शियम म्हंटल की दूध डोक्यात येत. पण दुधाव्यतिरिक्त असे काही पदार्थ आहेत जे तुमची कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता.

Deficiency of Calcium
Deficiency of Calcium (Unsplash)

Lifestyle News in Marathi: आपलं शरीर चालण्यासाठी अनेक गोष्टींची मदत लागते. अनेक पोषक तत्व आपलं शरीर चालवण्यास मदत करते. यातलं महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. हाडे आणि दात सोडून हे स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी हे अत्यंत आवश्यक असते. परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की जेव्हा जेव्हा कॅल्शियमची कमतरता जाणवते तेव्हा तेव्हा केवळ हाडे आणि स्नायू कमकुवत होत नाहीत तर- त्याचा त्वचेवर आणि केसांवर देखील परिणाम होतो. अशा परिस्थितीत आपल्याला आठवत ते दूध. पण दुधाव्यतिरिक्त असे काही पदार्थ असतात जे कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकतात.

कोणते पदार्थ पूर्ण करतील कॅल्शियमची कमी?

> भाज्यांच्या बिया फार महत्त्वाच्या असतात. यामध्ये प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असतात. हे कॅल्शियमची कमतरताही पूर्ण करतात. चिया बियांसह अनेक बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे. उदाहरणार्थ, १ चमचे (९ ग्रॅम) खसखसमध्ये १२७ मिलीग्राम कॅल्शियम असते.

Iron level:या ५ पदार्थात असतात भरपूर प्रमाणात लोह, कमतरता टाळण्यासाठी आहारात करा समावेश!

> खसखस, तीळ, भाजी किंवा कोशिंबीर अशा पदार्थांमधूनही कॅल्शियमची कमी पूर्ण होते.

> तिळाच्या बियांमध्ये १ चमचे (९ ग्रॅम) कॅल्शियम, तसेच तांबे, लोह आणि मँगनीजसह इतर खनिजे असतात. यात मुबलक प्रमाणत कॅल्शियम असते.

> पनीरमुळे उत्तम कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. पनीरमध्ये प्रति कप २३ ग्रॅम प्रोटीन असते. दहीमध्ये प्रोबायोटिक्स देखील समृद्ध असतात, एक प्रकारचे फायदेशीर बॅक्टेरिया जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात, हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात आणि पोषक तत्वांचे शोषण वाढवू शकतात.

Weight loss tips: या नियमाचं करा पालन, वजन कमी करण्यास होईल मदत!

> एक कप (२४५ ग्रॅम) साध्या दह्यामध्ये कॅल्शियम २३% असते, तसेच भरपूर फॉस्फरस, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे B2 आणि B12 असतात.

> मासे कॅल्शियम आणि ओमेगा -३ प्रदान करतात, ज्यामुळे तुमचे हृदय, मेंदू आणि त्वचेच्या आरोग्यास फायदा होतो.

Benefits Of Jaggery After Meal: जेवल्यानंतर मिठाई किंवा चॉकलेट खाण्याऐवजी खा गूळ, मिळतील अनेक फायदे!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)