मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Islands in India: केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील ही बेटं आहेत सुंदर, पाहा कसे जावे

Islands in India: केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील ही बेटं आहेत सुंदर, पाहा कसे जावे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 13, 2024 08:05 PM IST

Travel Guide: लक्षद्वीपच्या सौंदर्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. पण भारतात इतरही अनेक बेटे आहेत, जिथे तुम्ही जाऊ शकता. भारतातील कमी माहीत असलेल्या या सुंदर बेटांबद्दल जाणून घ्या.

भारतातील कमी माहीत असलेली बेटं
भारतातील कमी माहीत असलेली बेटं (unsplash)

Beautiful Lesser Known Islands in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर लोकांमध्ये या सुंदर बेटावर फिरायला जाण्याची इच्छा वाढली असेल. शिवाय सध्या सोशल मीडियावर हे चांगलेच ट्रेंडमध्ये आले आहे. पण भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात फक्त एक लक्षद्वीप नाही तर इतर अनेक बेटे आहेत, जेथील नैसर्गिक सौंदर्य कोणालाही भुरळ घालू शकते. जर तुम्ही लक्षद्वीपच्या सहलीचे नियोजन सुरू केले असेल तर आधी भारतातील या बेटांवर एक नजर टाका. तिथे गेल्यावर तुम्हाला कोणतीही खंत राहणार नाही आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटता येईल. पाहा हे कमी माहीत असलेली बेटं.

माजुली बेट

माजुली बेट हे नदीवर बांधलेले जगातील सर्वात मोठे बेट आहे. भारतातील सर्वात अनोख्या बेटांपैकी एक असलेल्या या बेटावर निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. गुवाहाटीहून जोरहाटला पोहोचल्यानंतर माजुली बेटावर जाण्यासाठी बोटीने जाता येते. जे दिवसातून फक्त दोन वेळा चालते. गुवाहाटी आणि जोरहाट पूर्णपणे फ्लाइटद्वारे कनेक्टेड आहेत.

दीव बेट

दिव बेटावर पोर्तुगीज संस्कृती आणि आर्किटेक्चरची झलक पाहायला मिळते. या बेटावर जाणे सोपे आहे. कारण हे अनेक शहरांशी फ्लाइटद्वारे कनेक्टेड आहे. अनेक शहरांमधून रस्त्यानेही येथे पोहोचता येते. गुजरातमधील हे बेट तेथील सुंदर बीच आणि सी फूडमुळे पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.

दिवार बेट

तुम्ही गोव्याला अनेकदा गेला असेल पण दिवार बेटाला भेट दिली आहे का? हे बेट पंजीमपासून १० किमी अंतरावर आहे. मांडवी नदीच्या काठावर बांधलेल्या या बेटावर गोव्याची संस्कृती जवळून पाहता येते.

सेंट मेरी बेट

सेंट मेरी बेट हे ४ लहान बेटांचा सेट आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील सेंट मेरी बेट अतिशय सुंदर आहे. येथे क्रिस्टल खडक तयार होतात. येथे जाण्यासाठी मलापे येथून बोटीने जाता येते. मात्र या बेटावर राहण्याची सोय नाही.

 

पंबन बेट

रामेश्वरमजवळ पंबन बेट बांधले आहे. जिथे पोहोचण्यासाठी पुलाची कनेक्टिव्हिटी आहे. पांढऱ्या वालुकामय समुद्रकिनाऱ्यामुळे पंबन बेट हे पर्यटकांचे आवडते आहे. जर तुम्ही तामिळनाडूच्या सहलीवर असाल तर या बेटाचे सौंदर्य पाहायला नक्की जा. जिथे पोहोचणे अगदी सोपे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel