Nita Ambani gave necklace to Radhika: रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने १२ जुलै २०२४ रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली हो ती. लग्नापूर्वी राधिकाने उघड केले होते की, ती आणि अनंत त्यांच्या मित्रांसोबत लाँग ड्राईव्हसाठी गेले होते. त्यादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. लवकरच, त्यांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली आणि २०२२ मध्ये, त्यांनी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा उरकला होता. या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. सोशल मीडियावर सतत या लग्नाबाबत अनेक पोस्ट, व्हिडीओ, फोटो पाहायला मिळाले होते.
अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. या कार्यक्रमांमध्ये अंबानी कुटुंबातील महिला अत्यंत सुंदर कपडे, दागिने परिधान केलेले दिसून येतात. या गोष्टींनी त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. प्रचंड महागडे आणि खास पद्धतीने बनवून घेतलेले कपडे आणि दागिने असल्याने ते सहजासहजी मिल्ने शक्य नसते. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या किंमती सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे त्या डिझाइन्स पाहण्यासाठी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीसुद्धा उत्सुक असतात. अनंत-राधिकाच्या लग्नातील कार्यक्रमांमध्येसुद्धा असंच काहीसं झालं होतं. नीता अंबानींपासून मुलगी ईशापर्यंत तर मोठी सून श्लोकापासून धाकटी सून राधिकापर्यंत सर्वांनीच एकापेक्षा एक महागडे कपडे आणि दागिने परिधान केले होते. ज्याच्या किंमती पाहून अनेकांना धक्का बसेल.
रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येते की, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी कुटुंबाने जवळपास ५००० कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय मुकेश आणि नीता अंबानी यांनीही या जोडप्याला अनेक अनमोल भेटवस्तू दिल्या आहेत. ज्याच्या किंमती पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल. नीता अंबानी आपल्या सुनांसोबत किती हसत-खेळत राहतात हे सर्वांनाच माहिती आहे. सुनांसोबत त्यांचे नाते आई आणि लेकीप्रमाणे दिसून येते. राधिकासुद्धा लग्नाच्या आधीपासूनच नीता यांच्या फारच जवळ आहे. लग्नापूर्वी अनेकवेळा नीता अंबानी आणि राधिका एकत्र एन्जॉय करताना दिसून आल्या आहेत. त्यामुळेच नीता अंबानींनी आपल्या सुनेला सर्वात सुंदर आणि महागडे गिफ्ट्स देणे साहजिकच आहे.
नीता अंबानींनी आपली धाकटी सून असणाऱ्या राधिका मर्चंटला कस्टम मेड ज्वेलरी आणि कार्टियर ब्रोच भेट दिले आहे. ज्याची किंमत २१. ७ कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे दागिन्यांची आवड असलेल्या नीता यांनी नववधू राधिकाला मोती आणि डायमंडने जडलेला लखलखता चोकरदेखील भेट दिला आहे. ज्याची किंमत तब्बल १०८ कोटी इतकी आहे. यापूर्वी २०१९ मध्ये, नीता यांनी मोठ्या सुनेला जगातील सर्वात महागडा नेकलेसदेखील भेट दिला होता. त्यात ९१ हिरे जडलेले होते आणि या नेकलेसची किंमत ४५२ कोटी रुपये आहे.