मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Nita Ambani: गोल्डन ब्लाउज आणि मोठ्या हिऱ्यांचा हार, नीता अंबानीच्या रॉयल लूकची जादू

Nita Ambani: गोल्डन ब्लाउज आणि मोठ्या हिऱ्यांचा हार, नीता अंबानीच्या रॉयल लूकची जादू

Jul 11, 2024 12:05 PM IST

Anant- Radhika Wedding Function: अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधी झालेल्या शिवशक्ती पूजेसाठी नीता अंबानीचा रॉयल लूक पहायला मिळाला. मोठ्या पोल्की डायमंड नेकलेस आणि निळ्या हिरव्या रंगाच्या लेहंगामध्ये तयार झालेल्या नीता अंबानीचा हा खास लूक पाहा.

नीता अंबानी रॉयल लूक
नीता अंबानी रॉयल लूक (hindustan)

Nita Ambani Royal Look: मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात नीता अंबानी कोणतीही कमी ठेवत नाही. त्यामुळेच जेव्हा जेव्हा त्या एखाद्या समारंभासाठी तयार होतात, तेव्हा फक्त त्यांचे कपडे आणि दागिन्यांचीच चर्चा होते. आई नीता अंबानी १२ जुलै रोजी होणाऱ्या लग्नापूर्वी सुरु असलेल्या विविध विधींमध्ये दररोज एकापेक्षा एक जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. नीता अंबानी यांनी १० जुलै रोजी शिव-शक्तीच्या पूजेसाठी असे दागिने घातले केले होते, की लोक फक्त त्याबद्दल बोलत आहेत. पाहा त्यांचा हा रॉयल लूक.

नीता अंबानी यांचा हिऱ्यांचा हार

पॅपराझींना पोझ देण्यासाठी कॅमेऱ्यासमोर येताच सर्वांच्या नजरा नीता अंबानी यांच्या डायमंड नेकलेसवर खिळल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना निळ्या रंगाच्या लेहंगा चोलीमध्ये पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. नीता अंबानी यांनी पूजेसाठी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली लेहंगा चोली घातली होती. ज्यावर हेवी भरतकाम होते. मयुरी शेड आणि डिझाइनचा लेहंगा नीता अंबानींसाठी खास बनवण्यात आला आहे. लेहंगाच्या खालच्या भागात संपूर्ण झिगझॅग पॅटर्न भरतकाम करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ब्लाउजही आहे खास

निळ्या रंगाची चुनरी आणि मयुरी शेड लेहंगा सोबत गोल्डन ब्लाउजची खास निवड करण्यात आली होती. गोल नेकलाइन आणि डीप बॅक या ब्लाऊजला अधिक आकर्षक बनवत होती. ब्लाउजवर चंदनाचा हार आणि चंद्राच्या धाग्यांनी भरतकाम केलेले आहे. मॅचिंगची काळजी घेत स्लीव्हवर लेहंगाचा एम्ब्रॉयडरी पॅटर्नही तयार करण्यात आला आहे.

दुपट्टा कॅरी करण्याची खास पद्धत

नीता अंबानी यांनी दुपट्टा एवढ्या ग्रेसफुल पद्धतीने कॅरी केला होता की, प्रत्येक महिला तयार होण्यासाठी या टिप्स घेऊ शकते. फॉलिंग पल्ला घेत लेहंगाचा दुपट्टा खांद्यावर टक करून कंबरेवर घेऊन फिक्स केला होता. तर ओपन पल्लूला हाताच्या मनगटाजवळ बांगडीच्या मागे फिक्स केले होते. ज्यामुळे त्यांचे दागिने दिसण्याबरोबरच कंफर्टेबल फील ही देत आहेत.

nita ambani photos
nita ambani photos (hindustan)

हिऱ्यांच्या हारावर खिळतील नजरा

नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी अत्यंत खास डिझाइनचे दागिने बनवल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी एमराल्ड आणि रुबीला मागे टाकत पोल्की डायमंडची निवड केली आहे. मोठ्या आकाराचे सहा पोल्की हिरे एकत्र बांधून हा नेकलेस तयार करण्यात आला आहे. ज्यात मॅचिंग इयर इयररिंग्स देखील आहेत. यात लहान- मोठे असे तीन पोलकी डायमंड आहेत. कपाळावरील बिंदी आणि साइडला लावलेली पांढरी फुले संपूर्ण लुकला खूप खास बनवत आहेत.

WhatsApp channel