Budget 2023: पुन्हा एकदा हातमागाच्या साडीत दिसल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन! लूकची होतेय चर्चा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Budget 2023: पुन्हा एकदा हातमागाच्या साडीत दिसल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन! लूकची होतेय चर्चा

Budget 2023: पुन्हा एकदा हातमागाच्या साडीत दिसल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन! लूकची होतेय चर्चा

Feb 01, 2023 02:59 PM IST

Nirmala Sitharaman's Budget 2023 look: अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षी त्यांच्या लूकची चर्चा असते.

Budget 2023
Budget 2023 (Reuters)

संपूर्ण देशाला अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा असतात सवलतींपासून ते टॅक्सपर्यंत प्रत्येक अर्थतज्ज्ञ आणि सामान्य माणूस अर्थसंकल्पावर बारकाईने लक्ष ठेवून असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा अर्थसंकल्प आणला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडीची चर्चा होतेय. बजेटच्या दिवशी त्या कोणती साडी नसणार याकडे सगळ्यांचे लक्ष असतं. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी कोणती कोणती साडी नेसली ते जाणून घ्या.

> यावेळी (२०२३) अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा हिशोबाच्या पुस्तकाची झलक दाखवली आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी बॉर्डरवर काळे धागे असलेली लाल रेशमी साडी परिधान केली आहे आणि सोनेरी रंगाची तपशिलही आहे. यावेळीही निर्मला सीतारामन यांनी केवळ हातमागाचा प्रचार केला आहे. देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

> चौथा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी रंगांच्या खास कॉम्बिनेशनची साडी नेसली होती. कॉपर आणि मरूनच्या मिश्रणाने बनवलेली हातमागाची साडी अर्थमंत्र्यांनी परिधान केली होती. या साडीच्या बॉर्डरवर बारीक चांदीच्या धाग्याचे काम होते. ही बोमकाई साडी होती जी खास ओडिशात बनवली जाते.

> महिलांना मॅचिंग गोष्टी आवडतात असं म्हणतात. २०२१ च्या अर्थसंकल्पात, लाल रंगाची साडी आणि लाल रंगाची लेजर खाते घेऊन आलेल्या दिसल्या. अर्थमंत्र्यांनी लाल आणि ऑफ-व्हाइट सिल्कपासून बनवलेली पोचमपल्ली साडी परिधान केली होती. इकत पॅटर्न साडीच्या बॉर्डरवर बनवला होता तर बॉर्डर सोनेरी आणि हिरव्या रंगाची होती. सोबत लाल रंगाचा मॅचिंग ब्लाउज घातला होता.

> २०२० च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी पिवळी साडी नेसली होती. ही साडी सोनेरी रंगाच्या सिल्कची होती. अर्थमंत्र्यांनी साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातला होता. दुसरीकडे साडीची बॉर्डर निळी होती. भारतीय संस्कृतीत, पिवळा रंग उत्सव आणि उत्साहाशी संबंधित आहे. अशा स्थितीत लाल रंगाच्या लेजरच्या विरूद्ध असलेली ही पिवळ्या रंगाची साडीही काहीसे असेच सांगत होती.

> निर्मला सीतारामन यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आयुष्यातील हा ऐतिहासिक दिवस अधिक ऐतिहासिक बनवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी चमकदार गुलाबी आणि सोनेरी बॉर्डरची मंगलगिरी साडी नेसली होती. ब्रीफकेसचा ट्रेंड संपल्यानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा लेजरची ओळख झाली. अर्थसंकल्पाची सर्व कागदपत्रे लाल रंगाच्या रेशमी कापडात गुंडाळून वर राष्ट्रीय स्तंभ लावण्यात आला होता.

Whats_app_banner