Weight Loss Drink Recipe In Marathi : आपल्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीत आज कामाचा ताण मानसिकदृष्ट्या दुप्पट वेगाने वाढत आहे. पण, त्याचवेळी शारीरिकदृष्ट्या आपण पूर्णपणे निष्क्रिय होत चाललो आहोत. दिवसभर लॅपटॉपसमोर बसून राहणे, जास्त ताण घेणे आणि सहज उपलब्ध असलेल्या डबाबंद व रेडिमेड वस्तूंचे सेवन, यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. वाढत्या वजनामुळे प्रत्येकजण त्रस्त असून, तो कमी करण्यासाठी शॉर्टकट शोधण्यात गुंतला आहे. परंतु, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी आणि योग्य मार्ग म्हणजे अन्न आणि कसरत या दोन्हींचा योग्य समतोल साधणे. मात्र, आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास थोडा वेगवान करू शकता. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध योगगुरू हंसाजी योगेंद्र यांनी दिलेल्या एका फॅट कटर ड्रिंकची रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या पोटाची वाढती चरबी कमी होण्यास खूप मदत होईल.
प्रसिद्ध योगगुरू हंसाजी योगेंद्र यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आयुर्वेदिक वजन कमी करण्याच्या पेयाची रेसिपी शेअर केली आहे. हे पेय आपल्या पोटाची चरबी लवकर बर्न करण्यास मदत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे. हंसाजी योगेंद्र यांच्यानुसार महिनाभर सतत याचे सेवन केल्याने पोटावरील चरबी लक्षणीय गतीने कमी होते. तथापि, आपला आहार आणि वर्कआउटची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. हे वजन कमी करणारे पेय केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर, संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
योगगुरू हंसाजी योगेंद्र यांनी सांगितलेले बेली फॅट कटर ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दीड कप पाणी घ्यावे. आता त्यात दालचिनीचे दोन तुकडे घाला आणि साधारण १० मिनिटे उकळेपर्यंत चांगले शिजू द्या. दालचिनी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, तसेच चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.
आता दहा मिनिटे खळखळून उकळल्यावर, त्यात सुमारे एक इंच आल्याचा तुकडा घाला. मंद आचेवर पुन्हा १० मिनिटे काढा उकळू द्या. आले चयापचय देखील वाढवते, तसेच रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापनात खूप उपयुक्त आहे. आता हे पेय उकळताना त्यात पाव चमचा गुग्गुळ पावडर घाला. याचबरोबर पाव चमचा गार्सिनिया पावडर घालून पेय थोडा वेळ उकळू द्यावे.
गुग्गुल आणि गार्सिनिया दोन्ही आपले वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. ते तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक दुकानातून सहज खरेदी करू शकता. आता हे वजन कमी करणारे पेय एका ग्लासमध्ये काढून त्यात चिमूटभर हळद घाला. हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे, वजन व्यवस्थापनासाठी खूप उपयुक्त आहे. आता हे पेय नीट मिक्स करा आणि गरम चहासारखे प्या.
(साभार- द योगा इन्स्टिट्यूट)
संबंधित बातम्या