मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Night Skin Care: त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी नाइट केअर महत्त्वाची, हे आहेत बेस्ट ओव्हरनाईट फेस मास्क

Night Skin Care: त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी नाइट केअर महत्त्वाची, हे आहेत बेस्ट ओव्हरनाईट फेस मास्क

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 08, 2024 10:23 PM IST

Hydrated Skin: चमकदार त्वचेसाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. त्वचा हायड्रेटेड राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. पण काही ओव्हरनाईट फेस मास्क आहेत जे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

नाईट स्किन केअर टिप्स - ओव्हरनाईट फेस मास्क
नाईट स्किन केअर टिप्स - ओव्हरनाईट फेस मास्क

Overnight Face Mask: प्रत्येकजण रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीन फॉलो करतो. परंतु तरीही त्वचा अपेक्षेप्रमाणे चमकत नाही. हे त्वचेला पूर्ण पोषण मिळत नसल्यामुळे होते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. हायड्रेशनसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे. तुम्ही काही ओव्हरनाईट फेस पॅकच्या मदतीने आपली त्वचा चमकदार बनवू शकता.

रोजहिप ऑइल फेस मास्क

रोजहिप व्हिटॅमिन आणि फेमोलिक कम्पाउंडने समृद्ध असते. जसे टोकोफेरॉल, कॅरोटीनोइड्स आणि टॅनिन इत्यादी. ज्यामुळे ते शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट बनतात. अँटी इंफ्लेमेटरी स्किन एजिंग साइन कमी करण्यास मदत करते. ते वापरण्यासाठी एक चमचा एलोवेरा जेल ५ थेंब रोजहिप ऑइलमध्ये मिक्स करा आणि आपल्या चेहऱ्याला मसाज करा.

गुलाब जल आणि कॅमोमाईल मास्क

एक चमचा गुलाब पाण्यात २-३ थेंब कॅमोमाइल तेल मिक्स करा. चिमूटभर हळद घाला आणि झोपण्यापूर्वी हे मिश्रण कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा. गुलाब पाणी मुरुमांना कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नष्ट करतात.

जोजोबा ऑइल आणि टी ट्री एसेंशियल ऑइल फेस मास्क

एक चमचा जोजोबा ऑइलमध्ये टी ट्री एसेंशियल ऑईलचे २-३ थेंब मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. टी ट्री ऑइल वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला टी ट्री ऑइलची एलर्जी असेल तर हा मास्क टाळा. जोजोबा तेल आणि टी ट्रीट ऑइलमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

बदामाचे तेल फेस मास्क

एक चमचा बदामाचे तेल आणि एक चमचा ताजे एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हे कोरडे होऊ द्या आणि झोपा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. बदामाच्या तेलामध्ये स्क्लेरोसंट गुणधर्म देखील असतात, जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात.

एलोवेरा आणि व्हिटॅमिन ई फेस मास्क

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधून तेल पिळून घ्या आणि एलोवेरा जेलमध्ये मिक्स करा. ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हे तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांच्या नुकसानीपासून संरक्षण करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग