New Year 2024: संपूर्ण जगाने नुकतंच नवीन वर्षाचं स्वागत केलं. अजूनही नवीन वर्षाचं स्वागत पूर्ण झालेला नाही. अजूनही सेलिब्रेशन सुरु झालं आहे. नवीन वर्ष नवीन आशा, नवीन नाते आणि नवीन संधी घेऊन येते. तसेच २०२४ स्वागत झाले. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या भारताच्या शेजारी असे अनेक देश आहेत जे १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाहीत. नवीन वर्ष १ जानेवारीला ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार साजरे केले जाते आणि हे कॅलेंडर जगभरात प्रचलित आहे. पण तरी काही देशांमध्ये या दिवशी नवीन वर्ष साजरे केले जात नाही. चला जाणून घेऊयात कोणते आहेत हे देश...
चीनमध्ये केवळ चंद्रावर आधारित कॅलेंडर मानले जाते. चीनी नववर्ष २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान येते.
अनेकांचा आवडीचा देश म्हणजे थायलंड. हा देश देखील १ जानेवारीला नवीन वर्ष साजरा करत नाही. थायलंडमध्ये १३ किंवा १४ एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. थाई भाषेत त्याला सॉन्गक्रान म्हणतात.
श्रीलंकेतही एप्रिलच्या मध्यात नवीन वर्ष साजरं केलं जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला अलुथ म्हणतात. या दिवशी लोक नैसर्गिक गोष्टी मिसळून स्नान करतात.
सौदी अरेबिया आणि यूएईसह बहुतेक देश इस्लामिक कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करतात. इस्लामिक नवीन वर्षाची तारीख किंवा रास अस-सनह अल-हिजरिया दरवर्षी बदलते.
रशिया आणि युक्रेनचे लोकही १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाही. या दोन्ही देशांमध्ये नवीन वर्ष १४ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)