Kashmiri Mutton Rogan Josh Recipe: नवीन वर्षाची पार्टी आणखी टेस्टी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे डिशेस बनवणार असाल. जर तुमचे मित्र, पाहुणे नॉनव्हेज लव्हर असतील तर त्यांच्यासाठी ही काश्मिरी मटण रोगन जोश रेसिपी करून पाहा. काश्मिरी रोगन जोश हा पॅशन फ्रूट, रेड मीट, मसाले आणि दही यापासून बनवलेला एक लोकप्रिय काश्मिरी करी डिश आहे. त्याची चव आणि रंग भूक वाढवण्यास मदत करतात. नवीन वर्षाच्या पार्टीत तुम्हालाही घरातील पाहुण्यांसाठी काहीतरी खास डिश बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे तुम्ही भात आणि रोटी दोन्हीसोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घ्या काश्मिरी मटण रोगन जोशची ही रेसिपी.
- १ किलो मटणाचे तुकडे
- ३/४ कप दही
- ३-४ काळ्या वेलची (मोठी वेलची)
- ४-५ लवंगा
- ३-४ हिरव्या वेलची
- ८-१० काळी मिरी
- १ तुकडा जावित्री
- २ तमालपत्र
- ४-५ काश्मिरी सुक्या लाल मिरच्या
- ३ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
-१ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून जिरे पावडर
- १ टीस्पून गरम मसाला
- ३ टीस्पून बडीशेप पावडर
- १ टीस्पून सुंठ पावडर
- १ चिमूटभर केशर
- २ चमचे कोमट दूध
- १ टीस्पून जिरे
- १/४ टीस्पून हिंग
- ५ चमचे मोहरीचे तेल किंवा तूप
- मीठ चवीनुसार
तडक्यासाठी
- १/४ कप तूप
- १ तुकडा रतन ज्योत
हे बनवण्यासाठी बनवण्यासाठी सर्वप्रथम केशर गरम दुधात भिजवा. यानंतर काळी वेलची, लवंगा, हिरवी वेलची, काळी मिरी आणि जावित्री एका खलबत्यात टाकून हलकेच बारीक करून घ्या. आता दहीमध्ये लाल तिखट, बडीशेप, हिंग, सुंठ पावडर, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला पावडर आणि मीठ घालून फेटून घ्या.
आता करी बनवण्यासाठी कढईत मोहरीचे तेल किंवा तूप घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक केलेले अख्खा मसाले, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या आणि जिरे घालून ५ सेकंद तडतडू द्या. यानंतर पॅनमध्ये मटण घालून ५-६ मिनिटे शिजवा. यानंतर कढईत दुधात भिजवलेले केशर आणि दही घालून चांगले मिक्स करावे. १ कप गरम पाणी घालून चांगले मिसळा. आता मटण एक शिट्टी होईपर्यंत मंद आचेवर प्रेशर कुक करा. यानंतर कुकरची शिटी काढून २० मिनिटे शिजवा. ठरलेल्या वेळेनंतर गॅस बंद करून मटण वाफेवर शिजू द्या. कुकरचे झाकण उघडू नका.
आता काश्मिरी रोगन जोश करीसाठी तडका तयार करण्यासाठी प्रथम मध्यम आचेवर एका लहान पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात रतन जोत घालून एक मिनिट शिजवा. आता तूप गाळून भाजीत घाला. तुमचे चविष्ट काश्मिरी मटण रोगन जोश तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.