Couple New Year Resolution: पार्टनरसोबत घ्या हे नवीन वर्षाचे संकल्प, नाते होईल मजबूत आणि वाढेल प्रेम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Couple New Year Resolution: पार्टनरसोबत घ्या हे नवीन वर्षाचे संकल्प, नाते होईल मजबूत आणि वाढेल प्रेम

Couple New Year Resolution: पार्टनरसोबत घ्या हे नवीन वर्षाचे संकल्प, नाते होईल मजबूत आणि वाढेल प्रेम

Dec 25, 2023 09:43 PM IST

Relationship Tips: नवीन वर्षात तुमच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी आणि नाते मजबूत होण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत काही संकल्प घेऊ शकता. हे तुमच्या नात्यात प्रेम फुलवेल.

कपलसाठी नवीन वर्षाचे संकल्प
कपलसाठी नवीन वर्षाचे संकल्प

New Year Resolution for Couple: नवीन वर्ष म्हणजे आयुष्यात एका नव्या उत्साहाची, स्वप्न पूर्ण करण्याची आशा घेऊन येणारा काळ असतो. नवीन वर्षात आपल्या स्वतःमध्ये काही चांगले बदल करण्यासाठी व्यक्ती विविध संकल्प करत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअर, नोकरी, अभ्यास अशा विविध गोष्टींबाबत संकल्प घेऊन ते पूर्ण करण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली जाते. पण केवळ हे संकल्पच तुम्हाला यशस्वी बनवतात असे नाही. तर तुम्ही २०२४ हे वर्ष नाते सुधारण्यासाठी सुद्धा काही संकल्प करू शकता. आपल्या पार्टनरसोबतच्या नात्यात नवीनता आणि प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही एकमेकांना काही वचने देऊ शकता. असे केल्याने तुमच्या नात्यात केवळ प्रेमच वाढणार नाही तर तुमच्या पार्टनरसोबतचे बंध आणखी घट्ट होतील. या नवीन वर्षात तुमचे हरवलेले प्रेम पुन्हा नव्याने वाढवण्यासाठी कोणते संकल्प घ्यावे ते येथे पाहा.

वीकली आउटिंग प्लॅन करा

अनेकदा पार्टनरचा पुरेसा वेळ मिळाला नाही की अशी नाती कमकुवत होतात आणि तुटतात. आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये खूप व्यस्त आहे. त्यामुळे तो आपल्या नात्याला हवा तसा वेळ देऊ शकत नाही. तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर एकमेकांना वेळ देण्यासाठी आठवड्यातून एकदा आऊटिंगचे प्लॅन करा. असे केल्याने तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल. यामुळे नात्यात आनंद तर वाढेलच पण परस्पर समंजसपणाही वाढेल.

लगेच दूर करा गैरसमज

जेव्हा पार्टनरसोबत मतभेद होतात, तेव्हा कपल एकमेकांशी बोलणे बंद करतात किंवा जोडीदाराचा राग शांत होण्याची वाट पाहतात. पण अशी चूक करू नका. परस्पर गैरसमज ताबडतोब दूर करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा यामुळे कालांतराने तुमच्या नात्यात वाद वाढू शकतात. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की राग आल्यावरही तुम्ही एकमेकांशी अबोला धरणार नाही.

पार्टनरचा आदर करा

नात्यात प्रेम टिकवायचे असेल तर त्यात आदर असणे खूप आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराला कमी लेखल्याने तुमचे नाते पोकळ होऊ शकते. तुमचे नाते मजबूत ठेवण्यासाठी वचन द्या की तुम्ही तुमच्या जोडीदाराचाच नव्हे तर त्याच्या/तिच्या कुटुंबाचाही आदर कराल. असे केल्याने तुमच्या जोडीदाराशिवाय, तुमचे त्याच्या किंवा तिच्या कुटुंबासोबतचे नाते सुद्धा घट्ट होईल.

नात्यात प्रामाणिकता ठेवा

नवीन वर्षात घेतलेला हा संकल्प तुम्हाला तुमच्या नात्यात जाणवणाऱ्या तणावापासून वाचवू शकतो. प्रत्येक लहानसहान गोष्टीवर पार्टनरशी खोटे बोलणे टाळाल असे वचन द्या. लक्षात ठेवा तुमच्या जोडीदाराशी बोललेले एक छोटेसे खोटे देखील तुमच्या नात्यातील विश्वासाचा पाया कमकुवत करू शकते.

 

स्वतःला सुद्धा वेळ द्या

बऱ्याच वेळा अति थकवा आणि तणाव एखाद्या व्यक्तीला नकारात्मक बनवून त्यांचे नाते बिघडवू शकते. अशा परिस्थितीत जीवनात सकारात्मकता आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. यासाठी पार्लर किंवा योगा क्लासला जाऊन स्वतःला पॅम्पर करा आणि रिलॅक्स करा. जेणेकरून तुमच्या नात्यावर सकारात्मक प्रभाव पडण्यासोबतच तुम्हाला आतून बरे वाटू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner