New Year Resolution to Become Successful: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता काही दिवल उरले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण थाटामाटात करत असते. नवीन वर्षात आपल्या अनेक इच्छा, स्वप्न पूर्ण व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी तसे प्रयत्न केले जातात. नवे संकल्प घेतले जातात. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असतो. यासाठी आधी स्वतःला काही वचनं दिले पाहिजे. नवीन वर्षात यशाचे शिखर गाठायचे असेल तर तुम्ही स्वतःला ही वचने द्या.
रात्री कमी झोप झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तुमचे झोपेचे चक्र सुधारण्यासाठी नीट प्लॅनिंग करा. दररोज रात्री चांगली झोप येण्यासाठी तुमचे रुटीन फॉलो करा. चांगली झोप तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करते आणि दिवसभर काम करण्यासाठी हे आवश्यक आहे. यासाठी आधी तुमच्या स्लीप सायकलकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी स्वत: ला वचन द्या की तुम्ही वेळेवर झोपण्याचा प्रयत्न कराल, जे तुम्हाला यश मिळवण्यास मदत करेल.
अनेक लोक टाइम मॅनेजमेंट करुन आपले काम आणि पर्सनल जीवन यातील संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशन हे रामबाण उपाय म्हणून काम करते. दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने तुम्हाला शांत राहण्यास नक्कीच मदत होते. नवीन वर्षात स्वतःला ध्यान करण्याचे वचन द्या. याने तुमचे मानसिक आरोग्य देखील उत्तम राहिल.
जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात मोठे सूत्र म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचा आदर केला पाहिजे. प्रयत्न करा की तुमचा वेळ कधीही वाया जाणार नाही. जो व्यक्ती स्वतःच्या वेळेची कदर करतो तो इतरांच्या वेळेचीही कदर करू शकतो. वेळेला महत्त्व दिल्याने तुम्ही यशाची पायरी नक्की चढू शकता.
यश मिळविण्यासाठी नेहमी स्वतःला शिकण्याच्या टप्प्यात म्हणजेच विद्यार्थ्याच्या भुमिकेत ठेवा. नेहमी काहीतरी शिकत राहा. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातून तुम्ही खूप काही शिकू शकता. नवीन गोष्टी शिकल्याने तुम्हाला यश मिळवणे सोपे होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)