Hangover Tips : पार्टी प्लॅन करताय? मग, आधीच नोट करा हँगओव्हर घालवण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hangover Tips : पार्टी प्लॅन करताय? मग, आधीच नोट करा हँगओव्हर घालवण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स!

Hangover Tips : पार्टी प्लॅन करताय? मग, आधीच नोट करा हँगओव्हर घालवण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स!

Jan 15, 2025 11:34 AM IST

How To Get Rid Of Hangover : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पार्टी प्लॅन करत असाल, तर हँगओव्हर घालवण्याच्या या टिप्स आधीच नोट करून ठेवा.

How To Get Rid Of Hangover
How To Get Rid Of Hangover (Freepik)

Tips To Get Rid Of Hangover :  नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पार्टी प्लॅन करतात. या निमित्ताने सगळेच एकत्र जमून धमाल करतात. कधी कधी पार्टी आणि धमाल करताना कळत नाही आणि यादरम्यान ड्रिंक्स जास्त होतात. त्याचा फटका दुसऱ्या दिवशी हँगओव्हरच्या स्वरूपात सहन करावा लागतो. आता तुम्हीही अशी पार्टी प्लॅन करत असाल, तर आधीच काही उपाय नोट करून ठेवा. असे अनेक घरगुती उपाय आहेत, जे तुम्हाला हँगओव्हरघालवण्यास मदत करू शकतात.

हँगओव्हर घालवण्याचे उपाय


लिंबूपाणी

हँगओव्हर दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लिंबूपाणी पिणे. अशावेळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून प्यावा. लिंबूपाणी प्यायल्याने हँगओव्हरमुळे होणाऱ्या डोकेदुखीत आराम मिळेल. तसेच, उलट्या किंवा अतिसार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. याशिवाय लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता. 

दही 

अल्कोहोलची नशा दूर करण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. हे इतर कोणत्याही घरगुती उपचारांपेक्षा चांगले आहे. परंतु, दह्यामध्ये साखर मिसळू नका. अनेकदा मद्यपान केल्याने शरीरातील हानिकारक जीवाणू आतड्याच्या आरोग्याशी खेळ करतात. दही त्या वाईट जीवाणूंऐवजी चांगल्या जीवाणूंचा शरीरात निर्मिती करून समतोल साधते.

नारळाचे पाणी

हँगओव्हर दूर करण्यासाठी नारळ पाणी देखील एक चांगला मार्ग आहे. जास्त मद्यपान केल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला पुन्हा हायड्रेट करतात आणि आवश्यक पोषक द्रव्ये पुरवतात. 

केळी

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, केळी तुम्हाला हँगओव्हर घालवण्यासाठी मदत करू शकतात. केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट असतात, जे शरीरात प्रोबायोटिक गुणधर्मांचा संचार करतात आणि पाण्याची कमतरता दूर करतात. मद्यपान केल्याने शरीरातील अनेक पोषक घटक कमी होतात, त्यामुळे केळी खाल्ल्याने हा समतोल राहतो.

आले

जास्त मद्यपान केल्याने मळमळ आणि उलट्या होतात. अशावेळी आले किसून, त्यात एक चमचा मध मिसळून खावे. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि उलट्यांपासून त्वरित आराम देतात. तसेच, मध आणि आले खाल्ल्याने हँगओव्हरही दूर होतो. 


‘या’ गोष्टींचीही काळजी घ्या!  

मद्यपान करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून हँगओव्हर होणार नाही आणि आरोग्यही ठीक राहील. आपण पेय घेण्यापूर्वी आपल्या पोटात काय होते, यावर हँगओव्हर देखील अवलंबून असतो. म्हणजेच जर तुम्ही चांगला आणि संतुलित आहार घेतला असेल, तर नशा तुम्हाला तितका त्रास देणार नाही. रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने तुमच्या आरोग्याला अधिकच हानी पोहोचते. याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका, कारण अल्कोहोल आपल्याला डिहायड्रेट करते. मद्यपान केल्यानंतर निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे हँगओव्हर वाढू शकतो.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner