5 times in India new year celebrated: आता नवीन वर्ष २०२४ येण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. खरं तर नवीन वर्ष (Happy New Year 2024) एखाद्या मोठ्या सणापेक्षा कमी नाही. वेगवेगळ्या देशात लोक त्यांच्या स्वतःच्या परंपरा आणि चालीरीतींसह हा दिवस साजरा करतात. जगातील बहुतेक देशांमध्ये ख्रिश्चन नववर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ख्रिश्चन वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंत १२ महिन्यांत विभागले गेले आहे. परंतु जगातील विविध धर्मांचे पालन करणारे लोक वेगवेगळ्या तारखांना नवीन वर्ष साजरे करतात. मात्र, १ जानेवारीला जगभरात नवीन वर्ष साजरे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एकदा नव्हे तर ५ वेळा नवीन वर्ष साजरे केले जाते. कसं ते जाणून घेऊयात...
हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून मानली जाते. असे मानले जाते की या दिवसापासून ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली. या दिवशी गुढी पाडव्याचा सण साजरा केला जातो.
जैन समाजाचे लोक त्यांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून साजरे करतात. याला वीर निर्वाण संवत असेही म्हणतात. या दिवसापासून जैन त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात.
१ जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करणे १५ ऑक्टोबर १५८२ पासून सुरू झाले. त्याच्या कॅलेंडरचे नाव ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. असे मानले जाते की ज्युलियस सीझरने ४५ व्या वर्षी ईसापूर्व ज्युलियन कॅलेंडर तयार केले. तेव्हापासून ख्रिश्चन नववर्ष साजरे करण्याची परंपरा आहे.
पंजाबमध्ये नववर्ष हा वैशाखी सण म्हणून साजरा केला जातो. वैशाखीचा हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. या काळात सर्व गुरुद्वारांमध्ये जत्रेचे आयोजन केले जाते.
पारशी धर्माचे नवीन वर्ष नवरोज सण म्हणून साजरे केले जाते. नवरोज साधारणपणे १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. शाह जमशेदजींनी ३ हजार वर्षांपूर्वी नवरोज साजरा करण्यास सुरुवात केली.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. )