मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year Healthy Plan: नवीन वर्षात वजन कमी करण्याचा विचार करताय? फॉलो करा हा डाएट प्लॅन

New Year Healthy Plan: नवीन वर्षात वजन कमी करण्याचा विचार करताय? फॉलो करा हा डाएट प्लॅन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 28, 2023 05:42 PM IST

Diet Plan For Weight Loss: जर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षात वजन कमी करायचे असेल तर आहारतज्ञांनी सुचवलेले हे डाएट प्लॅन फॉलो करु शकता.

नवीन वर्षात वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन
नवीन वर्षात वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन (unsplash)

New Year Weight Loss Plan: नवीन वर्षात लोक अनेक संकल्प घेतात. त्यातलाच एक म्हणजे वजन कमी करण्याचा संकल्प आहे. बरेच लोक निरोगी आणि फिट राहण्याचा संकल्प करतात. तुम्ही सुद्धा नवीन वर्षात वजन कमी करण्याचा विचार करत असाल पण सुरुवात कुठून करावी हे माहित नसेल तर आहारतज्ञ मनप्रीतने दिलेला हा डाएट प्लॅन फॉलो करा. २०२४ मध्ये वजन सहज कमी होईल. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन.

तुळशीचा चहा

सामान्य दुधाच्या चहाऐवजी तुळशीच्या चहाने दिवसाची सुरुवात करा. हा चहा तुमचा स्ट्रेस लेव्हल कमी करण्यास आणि कोर्टिसोल हार्मोन्स कमी करण्यास मदत करतो.

प्रथिनेयुक्त ब्रेकफास्ट

नाश्त्यात फक्त प्रथिनेयुक्त अन्न खा. बेसनाचा चीला, मूग डाळ डोसा, हिरवा मूग याप्रमाणे हे पदार्थ कॅलरीजमध्ये कमी आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. चयापचय वाढवण्याबरोबरच ते दीर्घकाळ पोट भरलेले ठेवते.

मेथी दाणे अवश्य घ्या

तुमच्या आहारात मेथीचा समावेश जरूर करा. नाश्त्याच्या बॅटरमध्ये मेथी दाणे घाला. मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी राखून भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

सूर्यनमस्कार करा

रोज सकाळी उठल्यावर सूर्यनमस्काराचा एक सेट करा. शरीर लवचिक बनवण्याबरोबरच सूर्यनमस्कारामध्ये प्रत्येक राउंडमध्ये संपूर्ण शरीरासाठी व्यायाम देखील समाविष्ट असतो. सूर्यनमस्कार शरीराचे क्लॉक सुधारते आणि कोर्टिसोल हार्मोन्सचे असंतुलन कमी करते. त्यामुळे तणावाची पातळी कमी होते.

ब्रोकोलाची करा समावेश

तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करा. आठवड्यातून दोन दिवस आहारात ब्रोकोली किंवा फुलकोबी खा. ब्रोकोली हलकी शिजवा आणि नंतर खा. ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन असते. जे नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यात मदत करते आणि लिव्हरचे आरोग्य सुधारते.

कोमट पाणी प्या

हिवाळ्यात फक्त कोमट पाणी प्या. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे चयापचय गतिमान होतो. जे वजन कमी करण्यासाठी आणि अन्न पचवण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

ग्रीन टी

संध्याकाळी एक कप ग्रीन टी प्या. यात चिमूटभर दालचिनी पावडर टाकल्यास फायदे वाढू शकतात. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात जे चयापचय वाढवण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करतात.

कर्बोदके महत्त्वाचे

नाचणी, ज्वारी, बाजरी यासारख्या कॉम्प्लेक्स कर्बोदके तुमच्या आहारात समाविष्ट करा. त्यात डायटरी फायबर असते. हे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते आणि पोट भरण्यास मदत करते.

 

वेट लॉस टी प्या

रात्री झोपण्यापूर्वी आले, वेलची, ओवा आणि चिमूटभर जायफळ एकत्र करून उकळवा. मग रात्री झोपण्यापूर्वी हा चहा प्या. या चहामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)