Foods Should Avoid With Lemon Juice: लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आपल्याला माहीत आहे. व्हिटॅमिन सी आणि मिनरल्ससोबतच यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. स्वयंपाकघरात लिंबाचा वापर केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर चवीसाठीही केला जातो. कुठल्याही पदार्थात आंबटपणा हवा असेल तर सर्वप्रथम लिंबाच्या रसाचा विचार येतो. ज्यामुळे चव तर वाढतेच पण आरोग्यासाठीही चांगले असते. उदाहरणार्थ, डाळ, कडधान्य यात लिंबाचा रस घालून खाल्ल्यास ते प्रथिने चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास आणि व्हिटॅमिन सी देण्यास मदत करतात. पण काही पदार्थ असे असतात, ज्यासोबत लिंबाचा रस चुकूनही खाऊ नये. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
काही पदार्थांमध्ये लिंबाचा रस घालणे हानिकारक असते. खरं तर लिंबू हे आम्लयुक्त अन्न असून त्यात आम्लीय गुणधर्म असतात. ज्यामुळे अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांशी प्रतिक्रिया होते आणि परिणामी पोटात पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात.
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे दुधात किंवा खवा, चीज किंवा दही सारख्या कोणत्याही दुग्धजन्य पदार्थात मिसळल्यास दुग्धजन्य पदार्थाचा टेक्सचर खराब होतो. तसेच दही ज्यामध्ये लॅक्टिक अॅसिड घटक असतात, त्यासोबत लिंबू खाल्ल्यास अॅसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात.
पदार्थांची चव जास्त मसाल्याशी संबंधित आहे त्यात लिंबाचा रस घालू नये. खूप जास्त मसाले, स्पायसी असलेले पदार्थात लिंबू टाकू नये. यामुळे टेस्ट बिघडते.
मीट सोबत जरी तुम्ही लिंबाचा रस मिक्स करत असाल पण काही प्रकारच्या माशांमध्ये लिंबाचा रस मिसळू नये. त्यामुळे माशांची चव खराब होते.
ज्या फळांची चव गोड असते, जसे केळी, आंबा, सफरचंद, टरबूज, चांगली पिकलेली स्ट्रॉबेरी यासोबत लिंबाचा रस मिसळू नये. यामुळे ब्लोटिंग आणि हार्ट बर्न होण्याची समस्या उद्भवते.
ताकासोबत लिंबाचा रस घालू नये. ज्याप्रमाणे दूध आणि दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळता येत नाही, त्याचप्रमाणे ताकात लिंबाचा रस मिसळू नये. हे पचनासाठी चांगले नसते.
अंड्यात लिंबाचा रस मिसळू नये. लिंबाचा रस अंड्यातील प्रथिने काढून टाकतो. यामुळे अंड्याचा पोतही खराब होतो. त्यामुळे अंड्याच्या बहुतांश पदार्थांमध्ये लिंबाचा रस वापरू नये.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या