Parenting Tips: मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात या ५ निगेटिव्ह गोष्टी, बोलण्यापूर्वी एकदा विचार करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात या ५ निगेटिव्ह गोष्टी, बोलण्यापूर्वी एकदा विचार करा

Parenting Tips: मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात या ५ निगेटिव्ह गोष्टी, बोलण्यापूर्वी एकदा विचार करा

Published Oct 02, 2023 07:28 PM IST

Negative Things for Kid's Mental Health: बऱ्याच वेळा पालक कळत नकळत अशा काही गोष्टी बोलतात ज्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा काही गोष्टी जाणून घ्या ज्या पालकांनी बोलण्यापूर्वी एकदा विचार केला पाहिजे.

पालकांच्या या गोष्टींचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो
पालकांच्या या गोष्टींचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो (unsplash)

Emotionally Harmful Things Parents Should Never Say To Kids: पालकांसाठी त्यांची मुले ही जगातील सर्वात मोठी संपत्ती असते. ते यशस्वी व्हावे यासाठी पालक बरीच मेहनत करत असतात. पालक मुलांवर संस्कार करताना कधी मुलांचे लाड करून तर कधी रागवून त्यांना योग्य मार्गावर चालायला शिकवतात. पण बऱ्याच वेळा नकळत पालक आपल्या मुलांच्या कृतीने किंवा मस्तीने इरिटेट होतात आणि रागाच्या भरात त्यांना काहीतरी बोलतात, ज्याचा मुलाच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. या गोष्टीचा पालकांना नंतर वाईट वाटते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलांशी बोलल्या तर त्यांच्या मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होतो.

- इंडियन पॅरेंटिंग डॉट कॉमच्या नुसार लहान मुले निष्पाप असल्याने त्यांच्या पालकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खूप लवकर मनावर घेतात. अशा वेळी त्यांच्या कामात नेहमी चुका शोधून त्यांना 'ते तुम्ही करू शकत नाही' असे सांगण्याऐवजी ते जे चांगले करतात त्याचे कौतुक करायला शिका.

- बर्‍याच वेळा मुलांना मित्र किंवा शाळेशी संबंधित एखाद्या गोष्टीमुळे दुखापत होते. अशा परिस्थितीत त्यांना रागवण्याऐवजी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा की ते अजूनही मुले आहेत आणि इतके टेन्शन घेण्याची गरज नाही. आपल्या मुलाच्या विचारांचा आणि भावनांचा आदर करून त्याला भावनिक आधार द्या.

- बरेच पालक आपल्या मुलाची इतर मुलांशी किंवा भावंडांशी तुलना करण्याची चूक करतात. यामुळे काही काळानंतर मुलाला असे वाटू लागते की आपण काहीही केले तरी ते आपल्या पालकांना आवडणार नाही, पालक प्रभावित होणार नाही. आणि यामुळे ते हळूहळू आपले विचार पालकांशी शेअर करणे थांबवतात.

- आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे नोकरी करणाऱ्या पालकांना इच्छा असूनही मुलांना पूर्ण वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा बिझी असल्यामुळे आई-वडील मुलांना सांगतात की त्यांच्यासाठी वेळ नाही. तुम्ही हे अजिबात करू नये. तुम्ही खूप व्यस्त असाल तर मुलाला नम्रपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला शांतपणे सांगा की त्याचे पालक व्यस्त असले तरी ते नेहमी त्यांच्या मुलासोबत उभे राहतील, त्यांच्या सोबतच असतील.

 

- अनेक वेळा पार्टनरसोबत वाद करताना कपल्स मुलासमोर आपल्या जोडीदाराला शिवीगाळ करू लागतात. ज्याचा मुलांच्या कोमल मनावर वाईट परिणाम होऊ लागतो. अशा वेळी मुलांसमोर तुमच्या पार्टनरला काहीही वाईट बोलू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner