
Symptoms For High Blood Sugar Level In Kids: आजकाल मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे. जवळजवळ प्रत्येक चौथा व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. ज्याची कारणे म्हणजे लठ्ठपणा, तणाव, चुकीची जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी हे आहेत. अनेकांना जन्मापासूनच मधुमेह असतो जो अनुवांशिक असतो. अशा लोकांमध्ये इन्सुलिनची पातळी योग्य नसते. मोठ्यांमध्ये आढळणारा हा आजार आजकाल लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या आहाराची आणि डेली रूटीनची काळजी घेणे गरजेचे आहे. जर अशी लक्षणे मुलांच्या शरीरात दिसली तर हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तेव्हा जास्त तहान लागते. जर मूल कोणतेही शारीरिक काम न करता सामान्यपेक्षा जास्त पाणी आणि लिक्वीड पदार्थ पीत असेल. तर हे लक्षण हाय ब्लड शुगर लेव्हलचे असू शकते.
वारंवार लघवी होणे ही मधुमेहाची सर्वात सामान्य समस्या आहे. आजकाल मुल नेहमीपेक्षा जास्त बाथरूम वापरत असेल तर सावध व्हा. हे रक्तातील साखरेचे प्रमाण हाय झाल्याचे लक्षण आहे.
जेवण केल्यानंतर काही वेळाने मुलाला पुन्हा भूक लागल्यास आणि ते काही खाण्याची मागणी करत असेल तर हे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे चिन्ह आहे.
टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये भूक वाढण्याऐवजी अचानक वजन कमी होऊ लागते. याचे कारण म्हणजे इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे शरीरातील पेशींना ग्लुकोजमधून आवश्यक ऊर्जा मिळत नाही. आणि वजन कमी होऊ लागते.
जर मूल खूप लवकर थकले आणि चिडचिड करू लागले तर ते शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीत अडथळा दर्शवते.
मुलाचे डोळे कमकुवत होऊ लागले आहेत आणि दृष्टी धूसर होऊ लागली आहे, अशा समस्या असतील आय टेस्टसोबत ब्लड टेस्ट सुद्धा करा. हाय ब्लड शुगरचा त्रास असलेल्या रुग्णांना अनेकदा डोळ्यांनी अस्पष्ट दिसते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
