Symptoms of Stomach Cancer: तुम्हाला सतत मळमळ किंवा उलट्या, अशक्तपणा किंवा भूक न लागणे, पोटदुखी, अचानक वजन कमी होणे अशा समस्या आढळून येत आहेत का? ही पोटाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. जेव्हा पोटाच्या आतील भागात हानिकारक पेशी असामान्यपणे वाढू लागतात पोटाचा कर्करोग हा जठराचा कर्करोग म्हणून ओळखला जातो. पेशींच्या या असामान्य वाढीमुळे ट्यूमरची निर्मिती होऊ शकते. हे सहसा पोटाच्या आतील भागात सुरू होते आणि त्वरीत उपचार न केल्यास ते शरीराच्या इतर भागांमध्ये देखील वेगाने पसरू शकते. काही प्रकरणांमध्ये, पोटाचा कर्करोग त्या ठिकाणी विकसित होऊ लागतो जिथे आपले पोट अन्ननलिकेला जोडले जाते, ज्याला गॅस्ट्रोएसोफेजल जंक्शन असे म्हणतात. नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअरचे संचालक- हेपॅटोबिलरी पॅनक्रियाटिक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजी डॉ. गणेश नागराजन यांनी पोटाच्या कर्करोगाविषयी सविस्तर सांगितले आहे.
- पोटाचा कर्करोग होण्याचा धोका ५५ ते ६० वर्षांनंतर वाढतो.
- महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
- जे लोक धूम्रपान करतात किंवा दारू पितात, त्यांच्या आहारात सोडिअमचे प्रमाण अधिक असते
- पोटाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास तसेच लठ्ठपणा
काहींना त्यांच्या पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात, विशेषत: अन्नाच्या सेवनानंतर या वेदना जाणवणे. त्यांना जळजळ, सूज येणे किंवा बद्धकोष्ठतासारखी लक्षणे दिसू शकतात. आहार आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करूनही हे अपचन कायम राहिल्यास हे एक चिंताजनक लक्षण ठरु शकते.
दिवसभर काहीही खाल्ले नसले तरीही भूक न लागणे किंवा काहीही खाण्याची इच्छा नसणे. यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि वजन कमी होणे आणि कुपोषण यांसारख्या आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते.
एखादे छोटेसे काम करून थकून जाणे हे लक्षण पोटाच्या कर्करोगाचा संकेत देऊ शकते. खाणे, चालणे, त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाणे आणि घरातील कामे करणे यासारख्या त्यांच्या दैनंदिन कामात थकवा जाणवू शकतो. अचानक अशक्तपणामुळे शारीरिक उर्जेच्या पातळीवरही परिणाम होतो.
एखाद्या व्यक्तीला पोटात तीव्र कळ जाणवणे यासारख्या वेदना होऊ शकतात जी कालांतराने असह्य आणि तीव्र होतात. ही वेदना मुख्यतः मधल्या किंवा वरच्या ओटीपोटात जाणवते. यामुळे पोटदुखी येऊ शकते किंवा काही तासांपेक्षा जास्त काळ वेदना राहिल्यास अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
एखाद्या पदार्थाचा विचार केल्यानंतर, जेवताना किंवा काहीही न खाता देखील मळमळणे. यामुळे वजन कमी होऊ शकते आणि भूक मंदावते.
पोटाच्या कर्करोगामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. ज्यामुळे उलट्यामध्ये रक्त किंवा मलावाटे रक्त जाऊ शकते, जे सामान्यतः काळा रंगाचे असते. याला हेमॅटोचेझिया असे देखील म्हणतात. स्टूलमधील रक्ताचा रंग अनेकदा रक्तस्त्राव होण्याचे नेमके कारण दर्शवतो. मलावाटे रक्त येणे हे इतर अंतर्निहित आरोग्य स्थिती देखील सूचित करू शकतात. त्यामुळे ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
कर्करोग पोटाच्या आतील भागात किती पसरला आहे यावर त्याचा उपचार अवलंबून असतो. निदान सामान्यतः वरच्या जीआय एंडोस्कोपी, बायोप्सी आणि सीटी स्कॅन द्वारे केले जाते. कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून रुग्णाला एकतर सुरुवातीच्या टप्प्यातील रोगामध्ये किंवा स्थानिक पातळीवरील प्रगत टप्प्यात थेट शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाला प्रथम केमोथेरपी दिली जाते. सर्जिकल उपचारामध्ये संपूर्ण डि२ लिम्फॅडेनेक्टॉमीसह गॅस्ट्रेक्टॉमी आवश्यकता असते. ज्यामध्ये सर्व निचरा होणाऱ्या लिम्फ नोड्स रिकामे करणे समाविष्ट असते. वेळीच निदान व उपचार हे पोटाच्या कर्करोगावर मात करण्यास तसेच लवकर बरे होण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या