Chronic Inflammation: शरीरात होणाऱ्या या समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात सूजची लक्षणे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chronic Inflammation: शरीरात होणाऱ्या या समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात सूजची लक्षणे

Chronic Inflammation: शरीरात होणाऱ्या या समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात सूजची लक्षणे

Published Jan 05, 2024 08:47 PM IST

Health Care Tips: आपल्या शरीरात होणाऱ्या समस्या या अनेक आजारांबद्दल सांगत असतात. जर तुम्हाला अशा काही समस्या शरीरात दिसत असतील ते शरीरात इंफ्लेमेशन म्हणजे सूज असल्याचे संकेत आहे. जाणून घ्या.

शरीरात होणारे इंफ्लेमेशन
शरीरात होणारे इंफ्लेमेशन (unsplash)

Signs of Chronic Inflammation in Body: अनेक आजार असे असतात जे शरीरात हळूहळू पसरतात. पण अनेकदा त्यांच्याबद्दल आपल्याला उशिरा कळते. मधुमेह, रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल याशिवाय अनेकांना त्रास देणारी एक समस्या म्हणजे सूज. शरीराच्या कोणत्याही भागात सूज येणे हे दुखणे आणि इतर आजारांचे कारणही बनते. जर शरीरात अशा समस्या उद्भवत असतील तर ते शरीरात सूज होण्याचे कारण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

स्नायूंमध्ये वेदना

जर तुम्हाला तुमच्या सांधे आणि स्नायूंमध्ये सतत वेदना होत असतील आणि जर याचे कोणतेही विशिष्ट कारण सापडले नाही तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या शरीरात सूज येत आहे. ही समस्या विशेषतः सकाळी उठल्यानंतर आणि व्यायामानंतर शरीरात जडपणाच्या स्वरूपात जाणवते.

पचनामध्ये समस्या

जर तुम्हाला अपचन, ब्लोटिंग, गॅस, पोट फुगणे आणि वारंवार मोशन होण्याच्या समस्येने सतत त्रास होत असेल आणि जर या समस्येचे निराकरण होत नसेल तर हे एक संकेत आहे की तुमच्या आतड्यांच्या भिंतींवर सूज आली आहे. याकडे दुर्लक्ष करु नका.

लठ्ठपणा

शरीरात सूज येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लठ्ठपणा. पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होणे हे सूजचे लक्षण आहे. त्यामुळे मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो आणि रक्तातील साखर वाढणे, हाय कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.

व्हिटॅमिन डीची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असल्यास शरीरात सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच इंफ्लेमेशनमुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होते. म्हणून सूज झाल्यास व्हिटॅमिन डीच्या पुरवठ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner