Chanakya Niti for Financial Problem: आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्यांच्या नीति शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये (चाणक्य नीती) आर्थिक बाबींसह जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. येथे चाणक्य नीतीच्या काही शिकवण आहेत, ज्याचा अवलंब करून आर्थिक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
विचार न करता पैसे खर्च केल्यास अर्थात अनावश्यक खर्च केल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्हाला अनावश्यक खर्च करण्याची इच्छा जाणवते, तेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करत आहात याची खात्री करा. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
पैसा खर्च करण्याआधी त्या खर्चाच प्लनिंग करण्यावर भर दिला पाहिजे. तुमचे उत्पन्न, खर्च आणि आर्थिक उद्दिष्टे सांगणारे बजेट तयार करा. तुमच्या गरजावर आधारित खर्च करा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा: पहिला, मी हे का करत आहे, दुसरे, परिणाम काय होतील आणि तिसरे, मी यशस्वी होईल का. याचा नीट विचार करा आणि जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील तेव्हाच पुढे जा.
कर्जामुळे तुमच्या आर्थिक स्थिरतेला हानी पोहते. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर ते फक्त शिक्षण किंवा गृहकर्ज यांसारख्या गरजांसाठी घ्या आणि ते परत करण्याची तुमच प्लांनिंग आहे याची खात्री करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)