मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  ...यासाठी व्यक्तीची पूर्ण झोप व्हायला हवी, आहेत बक्कळ फायदे
Sleep Benefits
Sleep Benefits (HT)
14 May 2022, 3:51 AM ISTAtik Sikandar Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 3:51 AM IST
  • अनेक लोकांना सध्या झोपेच्या बाबतील निद्रानाशासह त्यासंबंधीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु कोणत्याही आजारापासून सुटका करण्यासाठी व्यक्तीची पुरेशी झोप होणं आवश्यक आहे.

Sleep Benefits : सध्याच्या काळात व्यस्त जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळं अनेक लोकांची झोप होत नाहीये, अपूर्ण झोपेमुळं त्याचा विपरित परिणाम व्यक्तीच्या शरीरावर आणि त्याच्या कामावर होत असतो. तुम्ही अनेकदा ब्यूटी स्लीप विषयी ऐकलं असेल. एका संशोधनानुसार व्यक्तीच्या झोपेचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव हा त्याच्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर होत असतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत केलेल्या संशोधनात जर व्यक्तीची झोप झाली नसेल तर त्याचा प्रभाव हा व्यक्तीच्या बोलण्या आणि वागण्यावर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन दोन प्रसिद्ध डॉक्टरांनी केलं असून त्यात त्यांनी पुरुषांच्या दोन गटांना चार-चार तास झोपायला सांगण्यात आलं. त्यानंतर हे लोक उठल्यानंतर त्यांचे मेकअपशिवाय फोटो काढण्यात आले. त्यात कोणता व्यक्ती अॅक्टिव्ह, हेल्दी, उत्साही, आणि विश्वसनीय वाटतो, याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात वेगवेगळ्या लोकांच्या झोपेबाबत वेगवेगळी माहिती समोर आली.

ट्रेंडिंग न्यूज

ज्या लोकांची केवळ चार तास झोप झालेली होती त्या लोकांनी झोपेबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर ज्या लोकांची पूर्ण झोप झालेली होती त्या लोकांचा चेहरा अधिक उत्साही आणि प्रसन्न वाटत होता. त्यामुळं व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी गाढ झोप होणं आवश्यक असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय अनेक वैद्यकीय जाणकार आणि डॉक्टर्स दररोज किमान आठ तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात.

पुरेशा झोपेचे काय आहेत फायदे?

व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी त्याची पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. कारण जर पूर्ण झोप झाली नाही तर व्यक्तीला विविध आजार होण्याचा धोका असतो. किमान आठ तासांची झोप झाल्यास व्यक्तीला अन्नपचनाचा त्रास आणि पोटांचे विकार कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय त्वचा आणि चेहऱ्याच्याही समस्या या पूर्ण झोप घेतली तर नाहीशा होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग