मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi 2024: भांगेच्या हँगओव्हरपासून सुटका हवी आहे? घरी बनवा हे डिटॉक्स पेय!

Holi 2024: भांगेच्या हँगओव्हरपासून सुटका हवी आहे? घरी बनवा हे डिटॉक्स पेय!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 25, 2024 11:28 PM IST

Detox Drink: होळीच्या दिवशी भांगचा आस्वाद तुम्ही पण घेतलात का? आणि आता त्याचा हँगओव्हर उतरत नाहीये? या काही टिप्स तुम्हाला कामी येतील.

Sugarcane juice can help in fixing Bhang hangover.
Sugarcane juice can help in fixing Bhang hangover. (Unsplash)

Bhang Hangover: होळी हा रंगांचा हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. या दिवशी लोक एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावला. होळी हा भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा यांचे शाश्वत प्रेम आणि मिलन साजरा करतात. वाईटावर चांगुलपणाचा नेहमीच विजय होतो, हे ही होळी सांगते. होळी देशभरात विविध रंजक परंपरेने साजरी केली गेली. वृंदावनात फुलवली होळी साजरी केली जाते तर बरसाना आणि नांदगाव शहरात लठमार होळी साजरी केली जाते. रंगांचा सण सुख, समृद्धी, एकत्र आणतो आणि चांगल्या उद्याचे वचन देतो. होळी उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे होळी-विशेष स्नॅक्स आणि ड्रिंक्स. होळी-स्पेशल ड्रिंक म्हणून थंडाई तयार केली जाते. दूध, मसाले आणि गोड पदार्थ एकत्र मिसळून स्वादिष्ट थंडाई बनवली जाते. अनेकदा थंडाईत मिसळून भांग तयार केली जाते. होळीच्या दिवशी भांगचा आस्वाद तुम्ही पण घेतलात का? आणि आता त्याचा हँगओव्हर उतरत नाहीये? या काही टिप्स तुम्हाला कामी येतील.

साहित्य:

२०० मिलीलीटर उसाचा रस

काळे मीठ चवीनुसार

लाल मिरची पावडर आवश्यकतेनुसार काळी

मिरी पावडर आवश्यकतेनुसार चाट

मसाला

आवश्यकतेनुसार

मध

१/४ कप किसलेले आले

१ लिंबू

१० -१५ ताजी पुदिन्याची पाने

बर्फाचे तुकडे आवश्यकतेनुसार 

How To Remove Color: चेहऱ्यावर लागलेला पक्का रंग कसा काढायचा? जाणून घ्या टिप्स!

जाणून घ्या कृती

शॉट ग्लासमध्ये मध घाला आणि नंतर काळे मीठ, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला यांचे मिश्रण घाला. रस काढण्यासाठी आले चिरून घ्या आणि ग्लासमध्ये काळे मीठ आणि पुदिन्याची पाने घाला. बर्फाचे तुकडे आणि उसाचा रस घालून चांगले मिक्स करावे. थंड सर्व्ह करा. हे पेय भांग हँगओव्हर ठीक करण्यास आणि आपल्याला ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकते.

(रेसिपी: संजीव कपूर, शेफ)

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग