Navroj 2024: कसं साजरं होतं पारसी नववर्ष? 'या' दिवशी काय असतो खास बेत? वाचा रंजक गोष्टी-navroj 2024 how is the parsi new year celebrated what is the traditional food ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navroj 2024: कसं साजरं होतं पारसी नववर्ष? 'या' दिवशी काय असतो खास बेत? वाचा रंजक गोष्टी

Navroj 2024: कसं साजरं होतं पारसी नववर्ष? 'या' दिवशी काय असतो खास बेत? वाचा रंजक गोष्टी

Aug 16, 2024 08:04 AM IST

Parsi New Year 2024: पारसी दिनदर्शिकेनुसार त्यांचे नवीन वर्ष १६ ऑगस्टपासून सुरू होते. पारसी नववर्षाला 'जमशीदी नवरोज' असेही म्हणतात.

पारसी नववर्ष
पारसी नववर्ष

Parsi New Year 2024: 'नवरोज' हा पारसी समाजाचा प्रमुख सण आहे. यालाच पारसी न्यू इयर असे म्हटले जाते. पारसी नववर्ष आजपासून सुरू होत आहे. पारसी दिनदर्शिकेनुसार त्यांचे नवीन वर्ष १६ ऑगस्टपासून सुरू होते. पारसी नववर्षाला 'जमशीदी नवरोज' असेही म्हणतात. विशेष म्हणजे पारसी नववर्ष जगभरात वर्षातून दोनदा साजरे केले जाते. पहिला २१ मार्चला आणि दुसरा १६ ऑगस्टला. आज आपण नवरोजबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

नवरोजाचा अर्थ

‘नवरोज’ हा शब्द ‘नव’ आणि ‘रोज’ या दोन्ही शब्दांनी मिळून बनलेला आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. ज्यामध्ये ‘नव’ म्हणजे ‘नवा दिवस’ आणि ‘रोज’ म्हणजे ‘दिवस’ म्हणजेच ‘नवरोज’ म्हणजे ‘नवा दिवस’. पारसींच्या मते, ‘नवरोज’ म्हणजे निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस. निसर्गाचे आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.

'नवरोज' नावाचे महत्व-

माहितीनुसार, पारसी राजा जमशेद यांच्या नावावरून नवरोज सणाला नाव देण्यात आले आहे. पारसी किंवा शाहनशाही कॅलेंडर बनवण्याचे संपूर्ण श्रेयदेखील पारसी राजा जमशेद यांना दिले जाते. पारसी लोकांचा असा विश्वास आहे की, राजा जमशेदनेच जगाला विनाशापासून वाचवले. यावेळी राजे जमशेद यांचाही राज्याभिषेक झाला. तेव्हापासून हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जाऊ लागला.

कसा साजरा होतो पारसी नववर्ष?

पारसी नववर्षाला अर्थातच नवरोजच्या दिवशी पारसी लोक एकमेकांना भेटतात आणि भेटवस्तू देतात. घरांची स्वच्छता करून घरे रांगोळीने सजवली जातात. घरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले जातात. आजच्या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटवस्तू देण्याचीही परंपरा आहे. घरात चंदनाचे तुकडे ठेवले जातात. लोक पारंपारिक कपडे घालून आनंदाने नाचतात आणि गाणी म्हणतात. पारसी समाजातील लोक त्यांच्या देवतेची पूजा करतात आणि त्यांच्या राजाचे स्मरणदेखील करतात. यादिवशी लोक चित्र, मेणबत्त्या, काच, सुगंधी अगरबत्ती, साखर, नाणी अशा पवित्र वस्तू एका ठिकाणी ठेवतात आणि नंतर प्रार्थना करतात. अशाप्रकारे आजच्या दिवशी विविध गोष्टी केल्या जातात.

नवरोजला बनतात 'हे' पदार्थ-

भारतामध्ये विविध जातीधर्माचे लोक एकत्रित राहतात. प्रत्येक धर्माचे आपले वेगळे वैशिष्ट्य असते. त्यांच्या राहणीमानापासून खानपानापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये वैविध्य आढळते. त्यामुळेच पारसी लोकांचे भोजनसुद्धा काहीसे वेगळे असते. हे लोक नववर्षाला फरचास, रावो, शेवाळ्या, पात्रा नि मच्छी असे विविध खाद्यपदार्थ बनवतात.

 

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

विभाग