Health Benefits of Water Chestnut: नवरात्रीच्या उपवासात फराळामध्ये विविध पदार्थ खाल्ले जातात. उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी साबुदाण्याप्रमाणेच इतरही गोष्टींचा वापर केला जातो. त्यापैकी एक म्हणजे शिंगाडा. शिंगाड्याला इंग्रजीत वॉटर चेस्टनट असेही म्हणतात. वॉटर चेस्टनटमध्ये व्हिटॅमिन-सी, मॅगनीज, प्रोटीन, थायमिन असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पाण्याने समृद्ध असलेले हे फळ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. तर यामध्ये असलेले फायबर आणि रफेज वजन कमी करण्यास मदत करून चयापचय वाढविण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया उपवासात खाल्ले जाणारे शिंगाडे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.
शिंगाड्यामध्ये असलेल्या कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असल्याने यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे व्यक्तीची भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहते. शिंगाड्यामध्ये ७४ टक्के पाणी असते, जे भूक शांत करते आणि शरीरातील कॅलरीज वाढवत नाही.
यूरिन इंफेक्शन मध्ये सुद्धा शिंगाडा फायदेशीर ठरू शकतो. वॉटर चेस्टनटमध्ये असलेले एंझाइम मूत्राशय साफ करून बॅक्टेरिया बाहेर काढण्याचे काम करते.
शिंगाडा थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करू शकते. वॉटर चेस्टनटमध्ये असलेले आयोडीन आणि मॅगनीज थायरॉईडच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतात. शिंगाड्यामध्ये असलेले आयोडीन घशाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करून थायरॉईड ग्रंथी सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते.
शरीरात पाण्याच्या कमतरतेला डिहायड्रेशन प्रॉब्लेम म्हणतात. डिहायड्रेशनमध्ये व्यक्तीला उलट्या, अतिसार, जास्त घाम येणे, मूत्रपिंडाशी संबंधित आजार होऊ लागतात. अशावेळी वॉटर चेस्टनटचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शिंगाड्याला 'वॉटर फ्रूट' म्हणतात. यात पाणी आणि थंड करण्याचे गुणधर्म चांगले असतात. जे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करून हायड्रेशन वाढवतात.
वॉटर चेस्टनटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ग्लाइसेमिक इंडेक्स (जीआय) कमी असतो. कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)