Navratri Special Recipe: नवरात्रीच्या उपवासात दिवसभर एनर्जी हवी का? ट्राय करा फ्रूट क्रीम रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Special Recipe: नवरात्रीच्या उपवासात दिवसभर एनर्जी हवी का? ट्राय करा फ्रूट क्रीम रेसिपी

Navratri Special Recipe: नवरात्रीच्या उपवासात दिवसभर एनर्जी हवी का? ट्राय करा फ्रूट क्रीम रेसिपी

Oct 07, 2024 12:23 PM IST

Fasting Recipe: नवरात्रीच्या उपवासात जर तुम्हाला सुस्ती आणि अशक्तपणा जाणवत असेल तर फळांपासून बनवलेली ही फ्रूट क्रीम रेसिपी ट्राय करा. दिवसभर ऊर्जा राहील.

फ्रूट क्रीम रेसिपी
फ्रूट क्रीम रेसिपी (freepik)

Fruit Cream Recipe: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना जर तुम्ही तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणे टाळत असाल तर एनर्जी मिळवण्यासाठी फळे आणि नट्स वापरा. खरं तर रोज फळे खाणे अनेकांना कंटाळवाणे वाटते. पण तुम्ही उपवासासाठी फळांपासून फ्रूट क्रीम बनवून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला चव तर येईलच, शिवाय एनर्जी मिळवण्यासही मदत होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांत बनवू शकता. हे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि इच्छा होईल तेव्हा थंड खाऊ शकता. चला तर मग वाट कसली पाहताय या उपवासात एनर्जी मिळवण्यासाठी जाणून घ्या कसे बनवायचे फ्रूट क्रीम.

फ्रूट क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- फ्रेश क्रीम एक कप

- आईस क्यूब

- सफरचंद

- केळी

- डाळिंब

- पपई

- स्ट्रॉबेरी

- किवी

- आवडीचे इतर फळे

- बदाम

- काजू

- मनुका

- साखर किंवा मध

फ्रूट क्रीम बनवण्याची पद्धत

उपवासासाठी फ्रूट क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम बर्फाचे तुकडे एका मोठ्या भांड्यात ठेवा. नंतर या बर्फाच्या भांड्यात एक वाटी ठेवून त्यात फ्रेश क्रीम घालून नीट फेटून घ्या. काटा चमच्याच्या साहाय्याने क्रीम फेटून स्मूद करा. आता गोडव्यासाठी बारीक केलेली साखर किंवा थोडे मध घाला. आता हे नीट मिक्स करून फ्रीजरमध्ये ठेवा. क्रीम फ्रीजरमध्ये असताना सर्व फळे लहान आकारात कापून घ्यावीत. द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, केळी, पपई अशी फळे एकत्र करून एकाच ठिकाणी ठेवावीत. तुम्ही यात तुमच्या आवडीचे फळं वापरू शकता. आता जेव्हा खायचे असेल तेव्हा ही फळे तयार क्रीममध्ये घाला. ड्रायफ्रूट्सचे लहान तुकडे करा. जेणेकरून तोंडात घातल्यास क्रंची टेस्ट येईल. कापलेली फळं आणि ड्रायफ्रूट्स क्रीमध्ये मिक्स करून थंडगार सर्व्ह करा.

Whats_app_banner