Navratri sixth Day: आजच्या दिवशी आई कात्यायनीसाठी बनवा आवडता नैवेद्य, सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri sixth Day: आजच्या दिवशी आई कात्यायनीसाठी बनवा आवडता नैवेद्य, सोपी आहे रेसिपी

Navratri sixth Day: आजच्या दिवशी आई कात्यायनीसाठी बनवा आवडता नैवेद्य, सोपी आहे रेसिपी

Oct 08, 2024 09:53 AM IST

Katyayani Devi Naivedya: देवी भगवतीच्या या रूपाला मध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचा आस्वाद घेणे आवडते.

Navratri Recipes
Navratri Recipes (freepik)

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी भगवतीच्या या रूपाला मध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचा आस्वाद घेणे आवडते. अशावेळी तुम्ही ट्विस्टसह बदामाचा हलवा बनवू शकता. या हलव्याची चव चांगली तसेच पौष्टिक असते. चला तर मग जाणून घेऊया बदामाचा हलवा कसा बनवायचा.

बदामाचा हलवा बनवण्यासाठी साहित्य-

-अर्धा कप बदाम

-अर्धा कप दूध

-२ चमचे तूप

-१/४ कप साखर

-थोडे केसर

-अर्धा चमचा वेलची पूड

-काही ड्रायफ्रुट्स, चिरलेला

-दोन चमचे मध

बदामाचा हलवा कसा बनवायचा-

बदामाचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम अर्धा कप बदाम गरम पाण्यात किमान ३० मिनिटे भिजत ठेवावे. नंतर बदामाची साल सोलून ब्लेंडरमध्ये घाला. त्यात दूध घालून चांगले मिक्स करावे. गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत ते मिक्स करावे. आता हलवा बनवण्यासाठी एका मोठ्या कढईत बदामाची पेस्ट घालून त्यात एक चमचा तूप घाला. आता मंद आचेवर एक मिनिट परतून घ्या. त्याचा रंग थोडा बदलला की त्यात साखर घाला आणि नंतर सतत ढवळत भाजून घ्या. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. नंतर त्यात २ चमचे केशराचे दूध घालून मिक्स करून हलवा घट्ट होईपर्यंत मिक्स करत रहा. गरज पडल्यास हलव्यात तूप घालू शकता. कडांवरून तूप बाहेर पडू लागल्यावर वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. चिरलेले ड्रायफ्रूट्स आणि मधाने सजवून आई कात्यायनीला अर्पण करा.

टीप-

- केशराचे दूध तयार करण्यासाठी केशरचे काही धागे २ चमचे कोमट दुधात १० मिनिटे भिजत ठेवावे.

- साखरेचा वापर कमी करा कारण तुम्ही मधही घालणार आहात.

- हलवा मंद ते मध्यम आचेवरच शिजवावा.

Whats_app_banner