Chaitra Navratri Fasting Recipe: उपवासात बनवा टेस्टी फराळी आप्पे, नोट करा सोपी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chaitra Navratri Fasting Recipe: उपवासात बनवा टेस्टी फराळी आप्पे, नोट करा सोपी रेसिपी

Chaitra Navratri Fasting Recipe: उपवासात बनवा टेस्टी फराळी आप्पे, नोट करा सोपी रेसिपी

Apr 12, 2024 10:45 PM IST

Chaitra Navratri Fasting Recipe: नवरात्रीत नऊ दिवस उपवास करत असाल तर सतत तळलेले खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत भगरपासून बनवलेले आप्पे तयार करून शकता. ते बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे.

Chaitra Navratri Fasting Recipe: उपवासात बनवा टेस्टी फराळी आप्पे, नोट करा सोपी रेसिपी
Chaitra Navratri Fasting Recipe: उपवासात बनवा टेस्टी फराळी आप्पे, नोट करा सोपी रेसिपी (Freepik)

Farali Appe Recipe: चैत्र नवरात्र चालू आहे. अनेक भक्त पूर्ण नऊ दिवस दुर्गा देवीसाठी उपवास करतात. अशा परिस्थितीत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फळे आणि ज्यूससोबत काही फराळाचे पदार्थ खाणे आवश्यक असते. उपवासात साबुदाणा वडे सारखे तळलेले पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही झटपट फराळी आप्पे बनवू शकता. ते बनवायला खूप सोपे आहेत आणि लवकर तयार होतात. ते बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

फराळी आप्पे बनवण्यासाठी साहित्य

- एक वाटी भगर

- बारीक चिरलेली हिरवी मिरची

- ३ उकडलेले बटाटे

- १०० ग्रॅम दही

- देशी तूप

- बारीक किसलेले आले

- तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स

- सैंधव मीठ

- काळी मिरी

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- एका चमचा जिरे

फराळी आप्पे बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम भगर किंवा वरईचा भात तीन ते चार तास भिजत ठेवा. ते भिजल्यावर पाण्याने धुवा आणि बाजूला ठेवा. आता कढईत देशी तूप टाका आणि जिरे तडतडून घ्या. तसेच बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घाला. हिरवी मिरची सोबत बारीक चिरलेले काजू, बदाम आणि किशमिश टाका आणि भाजून घ्या. बटाटे उकळून घ्या. त्याचे साल काढून मॅश करा. हे मॅश केलेले बटाटे कढईत मिक्स करा. त्यात सैंधव मीठ आणि काळी मिरी पावडर घाला आणि चांगले मिक्स करा. गॅसची आंच वाढवून बटाट्याचे मिश्रण भाजून घ्या. जेव्हा बटाटे भाजून कढईला चिकटणे थांबले तेव्हा गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करा. शेवटी कोथिंबीरही घाला. आता भिजवलेली भगर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. भगर बारीक करण्यासाठी दही घ्या. जेवढी भगर आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घ्या. यात काळी मिरी पावडर आणि मीठ घालून बारीक करा. बॅटर तयार करा आणि झाकण ठेवा. तयार बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे बनवा. आप्पे पॅन गरम करून त्यात देशी तुपाने ग्रीस करा. 

बटाट्याचे गोळे साच्यात ठेवा आणि वर तयार केलेले भगरचे बॅटर घाला. जेणेकरून हे पिठ बटाट्याला कव्हर करत तळाशी जाईल आणि कव्हर करेल. आता झाकण ठेवून शिजवा. अधून मधून पलटत राहा. वेळोवेळी झाकण काढून तपासत राहा. चांगले शिजल्यावर आप्पे बाहेर काढा. तुमचे फराळी आप्पे सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Whats_app_banner