मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Fasting Tips: नवरात्री उपवासात वारंवार तहान लागते? घ्या हे पदार्थ, राहाल हायड्रेट आणि हेल्दी

Navratri Fasting Tips: नवरात्री उपवासात वारंवार तहान लागते? घ्या हे पदार्थ, राहाल हायड्रेट आणि हेल्दी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 12, 2024 04:28 PM IST

Chaitra Navratri Fasting Tips: अनेक भक्त दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. उपवासात फराळाचे पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागल्यास हे पदार्थ खा. तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागणार नाही.

Navratri Fasting Tips: नवरात्री उपवासात वारंवार तहान लागते? खा हे पदार्थ, राहात हायड्रेट आणि हेल्दी
Navratri Fasting Tips: नवरात्री उपवासात वारंवार तहान लागते? खा हे पदार्थ, राहात हायड्रेट आणि हेल्दी (freepik)

Tips to Stay Hydrated And Healthy During Navratri: चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीचे भक्त उपवास करतात. या काळात बरेच लोक अत्यंत सात्विक पद्धतीने राहतात आणि कमी खातात आणि फक्त फळं खाणे निवडतात. उपवासाच्या वेळी काही लोक तळलेले आणि तेलकट पदार्थ सुद्धा खातात. अशा स्थितीत दैनंदिन कामे करण्यात आळस आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्याचबरोबर हवामानामुळे पुन्हा पुन्हा तहान लागण्याची समस्या असते. अशा परिस्थितीत हे पदार्थ खाल्ल्याने आळस, अशक्तपणा आणि तहान लागणे या समस्या टाळता येतात. चैत्र नवरात्रीच्या उपवास दरम्यान हायड्रेट आणि हेल्दी राहण्यासाठी काय खावे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

काकडी

उपवास असेल तर काकडी खा. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत राहते. यासोबतच फायबर आणि आवश्यक खनिजे सुद्धा मिळतील. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि सुस्ती जाणवणार नाही.

टरबूज

टरबूज पाण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळीही स्थिर ठेवते. जर तुम्ही नऊ दिवस उपवास करत असाल तर टरबूज जरूर खा. उपवासाच्या दिवसांत ऊर्जा देण्यास मदत होईल.

लिंबू पाणी

एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस पिळून प्या. यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागण्याची समस्या कमी होईल.

पाणी पीत राहा

वारंवार तहान लागत असेल तर पाणी पित राहा. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.

लो फॅट फूड खा

तेलात किंवा तुपात तळलेले किंवा भाजलेले अन्न कमी खा. तेल किंवा तुपाच्या अति सेवनाने तहान वाढते. म्हणून शक्य तितकं कमी प्रमाणात खा. ज्यामुळे एनर्जी टिकून राहील.

हे देखील करा

यासोबतच नारळ पाणी आणि भाज्यांचा रस सुद्धा प्या. पण लक्षात ठेवा की फळांचे ज्यूस पिण्याऐवजी डाळिंब, संत्री, द्राक्षे, सफरचंद, चिकू ही फळे खावीत. जास्त वेळ पोट भरलेले राहण्यासोबतच वारंवार तहान लागण्याची समस्याही दूर होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel