How to make Fasting Momo: नवरात्रीत ९ दिवस उपवास करणारे लोक अन्नाबाबत संभ्रमात असतात. उपवासातील बहुतांश गोष्टी तूपापासून बनवल्या जातात, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. जर तुम्ही ९ दिवस उपवास केला असेल आणि तुम्हाला काही तरी हेल्दी खावेसे वाटत असेल तर तुम्ही फास्टिंग अर्थातच उपवासाचे मोमोज बनवू शकता. याची रेसिपी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तुम्ही एकदा ट्राय ही करू शकता. ज्यांनी उपवास केला नाही त्यांनीही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करावी. ही एक आरोग्यदायी रेसिपी आहे ज्यामध्ये तुपाचा वापर अगदी कमी आहे. पाहा व्हायरल मोमो कसा बनवायचा.
-साबुदाणा
-पनीर
-गाजर
-बीन्स
-कोबी
-तूप
-जिरे
-हिरव्या मिरच्या
-आलं
-मीठ
-मिरपूड
आधी साबुदाणा नीट धुवून मग भिजवावा. यासाठी पाणी आणि मीठ एकत्र मिसळून मग त्यात साबुदाणा घाला. आता गाजर, शेंगदाणे आणि कोबी कमी प्रमाणात घ्या. ज्या भाज्या तुम्ही उपवासाच्या वेळी खाता त्याच भाज्या घाला. हिरवी मिरची आणि आलं ही बारीक चिरून घ्या. आता एका कढईत तूप गरम करून मग तूपात जिरे, हिरवी मिरची आणि आले घालून परतून घ्या. आता सर्व भाज्या घालून नीट मिक्स करा.
त्यात मीठ आणि मिरपूड घाला. पनीर हाताने फोडून मग थंड होऊ द्या. आता भिजवलेले साबुदाणे चांगले मळून घ्या. मोमो बनवण्यासाठी मॅश केलेले साबुदाणे घ्या त्याची पारी बनवा आणि नंतर त्यावर सारण घाला आणि थोडे झाकून ठेवा.मग सर्व मोमोज अशा प्रकारे तयार करा. आता वाफ काढा. वाफवण्यापूर्वी बटर पेपर स्टीमरवर लावा. अशाप्रकारे उपवासाचे मोमो तयार आहेत.
संबंधित बातम्या