Navratri 2024: नवरात्रीच्या ९ दिवस बनवा विविध उपवासाचे पदार्थ, झटपट तयार होतात या गोष्टी-navratri 2024 try these 9 different fasting dishes for nine days navratri fast ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri 2024: नवरात्रीच्या ९ दिवस बनवा विविध उपवासाचे पदार्थ, झटपट तयार होतात या गोष्टी

Navratri 2024: नवरात्रीच्या ९ दिवस बनवा विविध उपवासाचे पदार्थ, झटपट तयार होतात या गोष्टी

Sep 30, 2024 01:41 PM IST

Navratri Fast: नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवास करणारे लोक अनेकदा काय खावे याबाबत संभ्रमात असतात. अशावेळी जाणून घ्या असे ९ पदार्थ जे तुम्ही उपवासासाठी बनवू शकता.

Navratri - नवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ
Navratri - नवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ (freepik)

Different Fasting Dishes for Navratri: ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. ९ दिवस चालणाऱ्या या महान उत्सवात काही लोक ९ दिवस उपवास करतात. अशा वेळी उपवासाचे पदार्थच खाल्ले जातात. काही लोक ९ दिवस एक वेळ उपवास ठेवतात. तर काही लोक ९ दिवस पूर्ण उपवास करतात. अशावेळी रोज उपवासात काय खावे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही ९ दिवसांच्या या उपवासासाठी ९ विविध पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ बनवणे सोपे आहे. शिवाय ते झटपट तयार होतात. चला तर मग जाणून घ्या नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी विविध उपवासाचे पदार्थ.

१. वरईच्या भाताचा पुलाव – उपवासाच्या वेळी वरईचा भात किंवा भगर खाल्ले जाते. त्यांच्या मदतीने तुम्ही चवदार पुलाव तयार करू शकता. हे कमी तुपात बनवता येते आणि चांगली गोष्ट म्हणजे हा पदार्थ पटकन तयार होतो. यामध्ये बटाटे, टोमॅटो, दुधी आणि हिरवी मिरची मिसळून बनवू शकता.

२. साबुदाणा खिचडी- साबुदाण्याची खिचडी दोन प्रकारे बनवली जाते. एक ओली आणि दुसरी कोरडी. उपवासाच्या काळात ओली खिचडी बनवून खा. त्यात बटाटे, टोमॅटो, काजू, मखाना आणि मनुका देखील घालू शकता. उपवासाच्या वेळी खाण्यासाठी हा एक आरोग्यदायी पदार्थ आहे.

३. इडली- साबुदाणा आणि भगर एकत्र करून इडली देखील बनवू शकता. उपवासादरम्यान तुम्हाला काही हेवी खायची क्रेविंग असेल तर तुम्ही ते बनवू शकता.

४. उपवासाचा डोसा- उपवासाच्या वेळी तुम्ही डोसा बनवू शकता. हे कुट्टूच्या पिठापासून बनवले जाते. यामध्ये तुम्ही पनीरची फिलिंग करू शकता.

५. आलू चाट- बटाटे भाजून त्याचे चाट बनवू शकता. उपवासाच्या वेळी चटपटीत पदार्थांची लालसा असेल तर नक्की ट्राय करा.

६. उपवासाचा आलू पराठा - उपवासात बटाट्याचे पराठे खाता येतात. हे पराठे राजगिऱ्याच्या पिठापासून बनवता येते.

७. मखाना चाट- उपवासाच्या काळात तेलकट पदार्थ कमी खायचे असतील तर मखाना चाट बनवा. यासाठी प्रथम मखाना थोड्या तुपात भाजून नंतर त्यावर दह्याचे कोटिंग करून त्यात उपवासाची आंबट गोड चटणी घालून सैंधव मीठ आणि भाजलेले जिरे शिंपडून खावे.

८. शेंगाड्याची कढी- शेंगाड्याच्या कढी नेहमीच्या कढीप्रमाणेच बनवली जाते. फक्त यात बेसन ऐवजी शेंगाड्याचे पीठ वापरले जाते. यामध्ये तुम्ही मोहरीचा तडका देऊन भगर सोबत खाऊ शकता.

९. मखाना खीर- उपवासाच्या वेळी मखाना खीरही खाल्ली जाऊ शकते. उपवासात ऊर्जा कमी वाटत असेल तर ही खीर बनवून खा.

Whats_app_banner
विभाग