Rice To Eat On Navratri: नवरात्रीचा सण भारतात अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. या काळात लोक दुर्गादेवीची पूजा करतात आणि नऊ दिवस उपवास करतात. उपवासात अनेक पारंपारिक खाद्यपदार्थ खाल्ले जातात, त्यातील एक मुख्य म्हणजे 'सामक भात' होय. त्यालाच वरई किंवा उपवासाचा भात असेही म्हणतात. सामक भात हा पौष्टिक आणि हलके अन्न म्हणून ओळखला जातो, जो उपवासाच्या वेळी शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतो. आज आपण सामक तांदळाचे आरोगयला मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत.
सामक तांदूळ हा खरा तांदूळ नसून 'बार्नार्ड बाजरी' नावाचा एक प्रकार आहे. हे धान्य ग्लूटेन-मुक्त आहे, जे उपवास दरम्यान वापरण्यास योग्य आहे आणि आरोग्यदायी आहे. साबुदाणा, कुट्टू आणि शिंगाडा यांसारख्या इतर धान्यांसह उपवास करताना हा एक प्रमुख पर्याय म्हणून घेतला जातो. यापासून आरोग्याला अनेक लाभसुद्धा मिळतात.
सामक भातामध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ते पचनास हलके बनवतात आणि ज्यांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे किंवा आवडत नाही त्यांच्यासाठी हे उत्तम आहे.
सामक भातामध्ये प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे जसे की बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. हे उपवास दरम्यान शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करतात.
यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्यांपासून आराम मिळतो.
सामक भातामध्ये कॅलरीज अत्यंत कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उपवास करताना जास्त कॅलरी घेणे टाळण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे अनेकजण वजन नियंत्रणात करण्यासाठीसुद्धा याचा वापर करतात.
नवरात्रीमध्ये सामक अर्थातच वरीचा तांदूळ विविध पाककृतींमध्ये वापरला जाऊ शकतो. सांगायचे झाले तर, या तांदळापासून तुम्ही खिचडी, पुलाव आणि उपमा बनवू शकता. शिवाय साबुदाणा किंवा बटाट्यात मिसळून स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात. उपवासाच्या वेळी हे तांदूळ कोथिंबीर, दही आणि शेंगदाणे बरोबर बनवून खाल्ली जाऊ शकते, ज्यामुळे ते अधिक पौष्टिक होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)