Durga Mata Naivedya: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना आणि कलश प्रतिष्ठापना करून दुर्गामातेचे घरात स्वागत केले जाते. असे मानले जाते की, देवी दुर्गा आपल्या भक्तांच्या घरी नऊ दिवस वास्तव्य करण्यासाठी येते. या काळात नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पूजेदरम्यान मातेच्या पूजेसोबत तिला नैवेद्यही बनवला जातो. मातेला दररोज विविध प्रकारचा तिच्या आवडीचा नैवेद्य दाखवला जातो.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. या दिवशी दूध किंवा गाईच्या तुपापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला काय अर्पण करावे आणि ते कसे करावे याबाबत जाणून घेणार आहोत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ शैलपुत्री देवीला अर्पण कराव्यात. तुम्ही तुमच्या नैवेद्याचा भाग म्हणून बदामाची खीर देखील बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध शिजवून पेडा बनवू शकता. परंतु आज आपण नैवेद्यासाठी अगदी मोजक्या साहित्यात बदामाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
-२५० ग्रॅम बदाम
-१.२५ कप गाईचे तूप
- १ कप साखर
- आता बदाम सोलून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- कढईत तूप गरम करा. नंतर त्यात बारीक वाटलेली बदामाची पेस्ट घाला.
- आता मंद आचेवर थोडावेळ बदाम भाजत राहा.
- पाच मिनिटांनंतर बदामांमध्ये साखर घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- शिऱ्याचा रंग बदलून सुगंध आल्यावर गॅस बंद करा.
-शिरा तयार आहे, दुर्गामातेला नैवेद्य अर्पण करून, तुम्ही प्रसादाचे वाटप करू शकता.