Navratri 2024 Navami: नवमीला बनवा पारंपरिक मूग डाळचा हलवा, झटपट होणारी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri 2024 Navami: नवमीला बनवा पारंपरिक मूग डाळचा हलवा, झटपट होणारी रेसिपी

Navratri 2024 Navami: नवमीला बनवा पारंपरिक मूग डाळचा हलवा, झटपट होणारी रेसिपी

Published Oct 10, 2024 04:01 PM IST

Kanya Pujan Recipe: यावेळी नऊ मुलींना आपल्या घरी बोलावून कन्या पूजन केले जाते. साधारणपणे २ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुली, दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक म्हणून पूजल्या जातात.

Navratri 2024 Navami Recipe
Navratri 2024 Navami Recipe (freepik)

Navratri 2024 Navami Recipe:  नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या वेळी अनेक लोक आपल्या घरातील मंदिरात कलशची स्थापना करतात, उपवास करतात. यानंतर अष्टमी किंवा नवमीला लहान मुलींची पूजा करून उपवास सोडतात. यावेळी नऊ मुलींना आपल्या घरी बोलावून कन्या पूजन केले जाते. साधारणपणे २ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुली, दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक म्हणून पूजल्या जातात. त्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. आणि त्यांना स्वादिष्ट पदार्थ खायला दिले जातात.

कन्या पूजनाची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पवित्र आहे. मुलींना हलवा-पुरी, हरभऱ्याची उसळ खायला दिली जाते. अशा परिस्थितीत अनेकजण बटाट्याची रसरशीत भाजीही बनवतात. तर मिठाईमध्ये पुडिंग आणि फळांचा समावेश करतात. बहुतेक लोक पिठाचा किंवा रव्याचा हलवा बनवतात. पण त्याऐवजी तुम्ही मूग डाळ हलवा देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया घरी मूग डाळ हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.

मूग डाळ हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

-१ वाटी पिवळी मूग डाळ

-अर्धी वाटी रवा

-१ वाटी साखर

-१ वाटी तूप

-१ वाटी दूध

-आवश्यकतेनुसार पाणी,

-१-२ चमचे वेलची पूड

-काजू, बदाम आणि बेदाणे (बारीक चिरलेले)

मूग डाळ हलवा बनवण्याची रेसिपी-

सर्वप्रथम मूग डाळ नीट धुवून २ ते ३ तास ​​पाण्यात भिजत ठेवा. आता भिजवलेली मूग डाळ चाळणीत ठेऊन जादाचे पाणी निथळून घ्या. नंतर ते मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. बारीक झाल्यावर एका भांड्यात मूग डाळीची पेस्ट काढा. आता एका कढईत तूप गरम करा. त्यानंतर त्यात रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात अजून थोडं तूप टाका. तसेच त्यात मूग डाळीची पेस्ट टाका. पण लक्षात ठेवा, हे करताना कोणाची तरी मदत घ्या जेणेकरून गाठी होणार नाहीत. तुम्ही डाळीची पेस्ट कढईत घालत असताना चमचाच्या साहाय्याने सतत ढवळत राहा. त्यामुळे हलव्यात गुठळ्या होणार नाहीत.

कढईत घातलेले सर्व मिश्रण चांगले भाजून घ्या आणि थोड्याफार गुठळ्या झाल्या की त्यात थोडे देशी तूप घाला. पुन्हा थोडा वेळ भाजून घ्या आणि नंतर गॅस बंद करा. यानंतर हलव्यात साखर घाला आणि दुसरीकडे गॅसवर थोडे पाणी गरम करा. त्यात केसर किंवा केशरी रंग टाकता येईल. आता हे पाणी मूग डाळीवर टाका आणि चांगले मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खवाही घालू शकता. यानंतर चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून मंद आचेवर काही मिनिटे पुन्हा शिजू द्या. आता तुमचा मूग डाळ हलवा तयार आहे.

Whats_app_banner