Navratri Naivedya Recipe: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. तिला योग आणि ध्यानाची देवी म्हटले जाते. माता कुष्मांडाला आठ भुजा आहेत, म्हणून तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पूजेमध्ये नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पेठा म्हणजेच कोहळा अर्पण करण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला आई कुष्मांडाला प्रसन्न करायचे असेल तर त्यांना कोहळ्याचा शिरा अर्पण करा. जे बनवायला खूप सोपे आहे, फक्त ही सोपी पारंपरिक रेसिपी लक्षात घ्या.
-एक कप कोहळा
-अर्धा कप साखर
-अर्धा कप देशी तूप
-८-१० धागे, केशर,
-वेलची पूड
-काजू ८-१०
-आणखी इच्छित ड्रायफ्रूट्स
-प्रथम कोहळा सोलून स्वच्छ धुवून घ्या.
-नंतर बिया काढून कोहळा किसून घ्यावा.
- कोहळा बारीक केल्यानंतर तो पाण्यात ठेवावा जेणेकरून तो काळा पडणार नाही.
- गॅसवर जाड तळाची कढई ठेवून तूप घालावे.
-नंतर पाणी चांगले पिळून हे कोहळ्याचा किस तुपात तळून घ्या आणि नंतर झाकून शिजवा.
- चांगले शिजल्यावर त्यात साखर घालून ढवळावे.
- साखर ढवळताना कोहळा चांगला शिजू द्या. जेणेकरून साखरेचे पाणी पूर्णपणे कोहळ्यात मुरते.
- लक्षात ठेवा कोहळा पूर्ण शिजेपर्यंत साखर घालू नका. अन्यथा कोहळा शिजणार नाही.
- रस पूर्णपणे कोरडे होऊ लागल्यावर केशर, वेलची पूड आणि काजू घालावे.
- काजू तुपात आधी भाजून घ्या. जेणेकरून काजूची चव वाढेल.
- आता तुमचा कोहळ्याचा शिरा देवीच्या प्रसादासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या