Navratri Vrat Tips for Pregnant Women: शारदीय नवरात्र हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे, जो देवी दुर्गाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्री ३ ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे. या नऊ दिवसांत मातेचे भक्त तिला प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्यासोबतच उपवासही ठेवतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही गरोदर असाल आणि बाळाच्या आरोग्यासाठी नवरात्री उपवास करण्याचा विचार करत असाल तर उपवासादरम्यान स्वत:चे आणि बाळाचे आरोग्य राखण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
गरोदर महिलांनी नवरात्रीच्या व्रताचा संकल्प करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण उपवास केल्याने अशक्तपणा, डिहायड्रेशन आणि आपल्या शरीरात साखरेची पातळी कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्याचा तुमच्यासोबत बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा.
गरोदरपणात दीर्घकाळ उपाशी राहिल्यास आईला अशक्तपणा, थकवा, अॅसिडिटी आणि डोकेदुखी सारख्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी या समस्या टाळण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने काहीतरी हेल्दी खात राहा.
अनेक स्त्रिया उपवासाच्या काळात बटाटा चिप्स, टिक्की आणि आलू पुरी सारख्या गोष्टी खात असतात. पण जर तुम्ही गरोदर असाल तर अशा तळलेल्या गोष्टींचे सेवन टाळा. या गोष्टींऐवजी भाजलेले मखाना, अक्रोड, बदाम आणि मनुका यांचा आहारात समावेश करावा. या गोष्टी तुमची भूक शांत करून तुमचे पोषण करण्याचे काम करतील.
तसं तर प्रत्येकाने स्वत:ला हायड्रेटेड ठेवले पाहिजे. पण जर तुम्ही गरोदर असाल तर तुमची गरज आणखीनच वाढते. उपवासादरम्यान शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही पाणी, नारळ पाणी, स्मूदी, ताक आणि लिंबूपाणी पिऊ शकता. एकाच वेळी भरपूर पाणी किंवा द्रव पिऊ नये याची विशेष काळजी घ्या. असे करण्याऐवजी घोट घोट प्या. याशिवाय नवरात्रीच्या उपवासात जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणे टाळा, हे बाळ आणि आई दोघांसाठीही हानिकारक ठरू शकते.
गरोदरपणात जास्त वेळ उभं राहून पूजा करणं टाळा. नवरात्रीत बसून आईची पूजा करावी. बराच वेळ उभे राहिल्याने महिलेला थकवा जाणवू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या