Sleeping Problems : झोपण्याच्या एक तास आधी ‘या’ २ गोष्टी पाण्यात मिसळून खा; झोपेच्या समस्या झटक्यात होतील दूर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sleeping Problems : झोपण्याच्या एक तास आधी ‘या’ २ गोष्टी पाण्यात मिसळून खा; झोपेच्या समस्या झटक्यात होतील दूर!

Sleeping Problems : झोपण्याच्या एक तास आधी ‘या’ २ गोष्टी पाण्यात मिसळून खा; झोपेच्या समस्या झटक्यात होतील दूर!

Nov 04, 2024 01:35 PM IST

Natural remedies for restful sleep: रात्रभर झोप न मिळाल्याने त्यांना दिवसभर झोप येत राहते. अशा परिस्थितीत कामातही काही चुका होतात.

Natural remedies for restful sleep
Natural remedies for restful sleep

Natural remedies for restful sleep : बहुतेक लोकांना रात्री चांगली झोप लागत नाही. काही लोक रात्रभर कुशी बदलत तळमळत राहतात. अशावेळी सकाळी उठल्यावर त्यांना चिडचिड वाटू लागते. त्यांचा मूड फ्रेश राहत नाही आणि ऑफिसला गेल्यावरही काम करावंसं वाटत नाही. कारण, रात्रभर झोप न मिळाल्याने त्यांना दिवसभर झोप येत राहते. अशा परिस्थितीत कामातही काही चुका होतात. जर तुमच्यासोबतही असे होत असेल आणि तुम्हाला रात्री ७-८ तास झोप येत नसेल, तर काळे मनुके आणि केशर पाण्यात भिजवून त्याचे सेवन करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल.

काळे मनुके आणि केशर करतील तुमची मदत!

पोषणतज्ज्ञ म्हणतात की, जर तुम्हाला झोप येत नसेल तर, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काळ्या मनुका आणि केशरचे सेवन केले पाहिजे. हे दोन्ही नैसर्गिक घटक आहेत जे चांगली झोप आणण्यास मदत करतात आणि आपण गाढ झोपू शकता. कारण, केशर आणि काळ्या मनुका खाल्ल्याने शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. ही दोन्ही हार्मोन्स चांगली झोप येण्यासाठी जबाबदार असतात. हे हार्मोन सकारात्मक पद्धतीने मूड आणि वर्तन देखील वाढवते.

Mucus In Chest: खोकला गेला पण अजून कफ आहे? करा 'हे' घरगुती उपाय, लगेच मोकळी होईल छाती

‘या’ दोन गोष्टी तुम्हाला रात्री चांगली झोपायला मदत करतील!

मनुका- मनुकामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट पॉलीफेनॉल आणि रेझवेराट्रॉल असतात, जे तुमच्या झोपेचे चक्र नियंत्रित करतात. या दोन्ही गोष्टी शरीरात मेलाटोनिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढवतात.

केशर- या महागड्या आणि गुणकारी पदार्थात सॅफ्रानलसारखे संयुगे असतात, जे शारोरातील सेरोटोनिनची पातळी वाढवतात. हे घटक शरीराला विश्रांती घेण्याचे प्रोत्साहन देतात. अधिक शांत झोपेसाठी तणाव आणि चिंता कमी करते.

कसे कराल सेवन?

एका भांड्यात १००मिली पाणी घ्या. त्यात ३-४ मनुके आणि ३-४ केशरच्या काड्या घाला. दोन्ही गोष्टी पाण्यात भिजू द्या. या पाणी तसेच किमान ४-६ तास ठेवून द्या आणि रात्री झोपण्याच्या एक तास आधी हे पाणी सेवन करा. पाण्यासोबतच केशर आणि मनुके एकत्र चावून खा. असे काही दिवस करून पहा, तुमची निद्रानाशाची समस्या नक्की दूर होईल.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner