National Women Day 2025 Wishes In Marathi : आज भारतात राष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. मात्र, या दिवसाबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो, की सगळीकडे महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. मग, भारतात १३ फेब्रुवारीला महिला दिन साजरा करण्याचं काय कारण आहे? या दोन दिवसांत एक फरक आहे, तो म्हणजे ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर, १३ फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा खास दिवस देशाच्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू यांच्याशी संबंधित आहे. हा दिवस भारताच्या पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू यांचा वाढदिवस आहे. म्हणूनच, सरोजिनी नायडू यांचे योगदान दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन साजरा करून लक्षात ठेवले जाते. या खास दिवशी तुम्ही देखील तुमच्या घरातील आणि तुमच्या आयुष्यातील महिलांना खास अंदाजात शुभेच्छा देऊ शकता.
नारी हीच शोभा आहे घराची…
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विश्वाचे सुख तोलणारी आणि
आभाळा एवढं दु:ख पेलणारी फक्त स्त्रीच असते!
राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे!
राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
स्त्री म्हणजे वात्सल्य
स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व
स्त्री म्हणजे कर्तृत्व
स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ
स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात
अशा अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना
राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काही लोक म्हणतात की स्त्रीचे
कोणतेच घर नसते.
परंतु आमचे मानणे आहे की
स्त्री शिवाय कोणतेही घर नसते.
अशा समस्त स्त्री वर्गाला,
राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चौकटीतून बाहेर पडून,
दुश्मनांच्या नजरेला नजर भिडवून
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना
राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखदुःखात साथ देतेस,
थकत नाहीस कधीच,
आयुष्य माझं अधुरे तुझ्याविना,
साथ सोडू नको कधीच
राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
संबंधित बातम्या