National Vaccination Day Significance: एकेकाळी जीवघेणा ठरणाऱ्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी लस महत्त्वाची भूमिका बजावते. पोलिओ आणि देवीसारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरले होते आणि या रोगांवर लसीकरण होईपर्यंत त्यांनी बरेच प्राण गमावले होते. लसीकरणामुळे आजारांचा धोका न पत्करता चांगले आयुष्य जगता येते. स्वत:ला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी लस घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स आणि नर्स वर्षभर अथक परिश्रम घेऊन आपण तंदुरुस्त आणि निरोगी असल्याची खात्री करतात. आपल्याला योग्य प्रकारे लस दिली जाते याची खात्री ते करतात. लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. हा महत्वाचा दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
१९८८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक पोलिओ निर्मूलन उपक्रमाची सुरुवात पृथ्वीवरून या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून सुरु केले. १९९५ साली याच दिवशी भारत सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम देशातून या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून सुरू केला. तेव्हापासून १६ मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी संसर्गजन्य आणि प्राणघातक आजारांपासून सर्वांना योग्य प्रकारे लस मिळावी यासाठी सरकारी आणि अशासकीय संस्था लसीकरण मोहीम राबवतात. लहान मुले आणि प्रौढ दोघांसाठीही लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे. प्राणघातक आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोकांना लस घेण्याचे महत्त्व पटवून देणे हे देखील त्याचे उद्दीष्ट आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांचा फैलाव टाळण्यासाठी वेळेवर आणि संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. या दिवशी लसीकरण संदर्भातील गैरसमजही दूर केले जातात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या