मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Sibling Day 2024: नॅशनल सिबलिंग डे ला भावा-बहिणीला या सुंदर मॅसेजने द्या शुभेच्छा, दिवस होईल आणखी खास

National Sibling Day 2024: नॅशनल सिबलिंग डे ला भावा-बहिणीला या सुंदर मॅसेजने द्या शुभेच्छा, दिवस होईल आणखी खास

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 10, 2024 09:32 AM IST

Happy Sibling Day: भाऊ आणि बहिणीचे नाते खूप खास आहे. ते त्यांना हवे तेवढे भांडतील, पण दोघेही एकमेकांसाठी ढाल बनून उभे राहतात. सिबलिंग डेला शुभेच्छा देण्यासाठी हे मॅसेज तुमच्या भावा-बहिणीला पाठवा.

National Sibling Day 2024: नॅशनल सिबलिंग डे ला भावा-बहिणीला या सुंदर मॅसेजने द्या शुभेच्छा, दिवस होईल आणखी खास
National Sibling Day 2024: नॅशनल सिबलिंग डे ला भावा-बहिणीला या सुंदर मॅसेजने द्या शुभेच्छा, दिवस होईल आणखी खास (HT)

National Sibling Day Wishes: भाऊ आणि बहिणी एकमेकांशी सर्वात खास बंध शेअर करतात. दोघेही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करतात. हे विशेष बंधन साजरे करण्यासाठी दरवर्षी १० एप्रिल रोजी देशभरात नॅशनल सिबलिंग डे म्हणजे राष्ट्रीय भावंड दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या भावाला किंवा बहिणीला पाठवण्यासाठी प्रेमळ शुभेच्छा येथे पहा. हे मॅसेज आपल्या बहिण आणि भावाला पाठवून तुम्ही आजचा दिवस आणखी खास बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

कोणत्याच नात्यात नसेल,

एवढी ओढ एकाच नात्यात आहे,

म्हणून भाऊ- बहिणीचं हे नातं

खूप गोड आहे...

Happy National Sibling Day!

 

तोंडावर भांडत असलो ना

तरी मनात खूप प्रेम आहे,

आईसारखी माया असलेले

ताई हे दुसरं रुप आहे.

Happy National Sibling Day!

 

पवित्र नाते हे बहीण भावाचे

लखलखत राहू दे हे नाते जिव्हाळ्याचे

Happy National Sibling Day!

 

नेहमी भांडूनही कधीच न तुटणारं

न बोलताही सर्व काही समजून घेणारं

एकमेकांची मनपासून काळजी करणारं

असं भाऊ बहिणीचं नातं....

Happy National Sibling Day!

आभाळाची साथ आहे,

अंधाराची रात आहे,

मी कधीच कशाला घाबरत नाही

कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे...

Happy National Sibling Day!

 

नातं बहिण भावाचं

म्हणजे टॉप अँड जेरी

तेवढाच राग आणि तेवढंच प्रेम

हे म्हणजे लय भारी

Happy National Sibling Day!

 

आईसमान भासते मज

मोठ्या बहिणीची माया

वटवृक्षाप्रमाणे सतत देते

ती मजवर तिची छाया

न सांगताच जी घेते

माझ्या मनाचा ठाव

आयुष्यभर माझ्या ओठी

माझ्या ताईचे नाव

Happy National Sibling Day!

चंद्रामुळे असतात चांदण्या मस्त

चांदण्यांमुळे असते रात्र मस्त

रात्री वरून असले लाइफ मस्त

आणि या जगात माझी बहिण सर्वात जबरदस्त

Happy National Sibling Day!

 

आकाशात दिसतील हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण माझ्या भावासारखा कोणी नाही

Happy National Sibling Day!

 

भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात

बस एवढचं अंतर असते

रडवून हसवतो तो भाऊ असतो

रडवून ती स्वतःही रडते ती बहिण असते...

Happy National Sibling Day!

सोबतीने बालपण जगलो

जगायचे आहे आता आयुष्यही

सोबतीने इतके घडलो

जपायचे आहे आता सारे काही...

Happy National Sibling Day!

WhatsApp channel

विभाग