मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Safe Motherhood Day 2024: डिअर वर्किंग लेडीज, हेल्दी प्रेग्नेंसीसाठी काम करताना या ५ गोष्टींकडे द्या लक्ष

National Safe Motherhood Day 2024: डिअर वर्किंग लेडीज, हेल्दी प्रेग्नेंसीसाठी काम करताना या ५ गोष्टींकडे द्या लक्ष

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 11, 2024 01:11 PM IST

Healthy Pregnancy Tips: जर तुम्ही गरोदर असाल तर हा तुमच्या आयुष्याचा एक खास टप्पा आहे. याला एक प्रकारचा दोष किंवा कमतरता मानू नका आणि कामापासून दूर जाऊ नका किंवा मदत मागायला संकोच करू नका.

National Safe Motherhood Day 2024: डिअर वर्किंग लेडीज, हेल्दी प्रेग्नेंसीसाठी काम करताना या ५ गोष्टींकडे द्या लक्ष
National Safe Motherhood Day 2024: डिअर वर्किंग लेडीज, हेल्दी प्रेग्नेंसीसाठी काम करताना या ५ गोष्टींकडे द्या लक्ष (unsplash)

Things To Do At Work For Healthy Pregnancy: सध्या बहुतांश महिला काम करत आहेत. करिअर बनवण्याचे आणि कुटुंबाचे नियोजन करण्याचे वय जवळपास सोबत चालते. या दोन जबाबदाऱ्यांमधील कोंडी कधीकधी तणावाचे आणि आरोग्याच्या समस्यांचे कारण बनते. म्हणूनच, जर तुम्ही नोकरी करत असाल आणि आई बनणार असाल तर तुम्हाला स्वतःच्या आणि तुमच्या होणाऱ्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आज राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त (national safe motherhood day) नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणेबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

गरोदरपणात ऑफिसला जात असाल तर सुरक्षित मातृत्वासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

जर कामाचे तास जास्त असतील तर बसण्याची व्यवस्था चांगली असावी

गरोदरपणात बसणे, बराच वेळ उभे राहणे यासारख्या लहान नित्य क्रिया ही सर्व कठीण कामे होतात. अशा परिस्थितीत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बराच वेळ बसून राहिल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. बराच वेळ बसून काम केल्याने पायांना सूज येते आणि उच्च रक्तदाबाची समस्या देखील होऊ शकते. त्यांना कसे व्यवस्थापित करावे हे आपल्याला माहित असले पाहिजे. ठराविक कालावधीनंतर काही वेळ इकडे तिकडे फिरण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या स्नायूंना ताणतणाव प्रतिबंधित करते आणि शरीरात विशेषतः पायांमध्ये द्रव जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. बसण्यासाठी खुर्चीची काळजी घ्या. तुमच्या गरजेनुसार आरामदायी खुर्चीची मागणी करण्यात काहीच गैर नाही. तसेच बसताना मागे उशी ठेवण्यास विसरू नका आणि पाय उंच ठेवण्यासाठी पायाखाली स्टूल किंवा इतर आधार ठेवू शकता.

ऑफिस दूर असल्यास पायांची काळजी घ्या

ऑफिसमध्ये जास्त वेळ उभे राहिल्यास किंवा प्रवास करताना उभे राहावे लागत असेल तर दोन्ही पायांवर भार टाकू नका. एका पायावर उभे राहा आणि एक पाय फूटरेस्ट, लूज स्टूल किंवा बॉक्सवर ठेवा. तसेच काही वेळाने दोन्ही पायांना विश्रांती देत ​​राहा. कम्फर्टेबल शूज आणि चांगले आर्च सपोर्ट दणारे फूटवेअर निवडा. जर तुमचे ऑफिस दूर असेल आणि तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर सार्वजनिक वाहनातही जागा मागायला लाजू नका. तो तुमचा अधिकार आहे.

गरोदरपणात कंबरेतून कधीही वाकू नका

जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुम्हाला वाकून काहीही उचलावे असेल तर गोष्ट कितीही हलकी असली तरी कंबरेतून वाकणार नाही याची काळजी घ्या. गुडघे वाकवून नेहमी खाली वाकण्याचा प्रयत्न करा. तसेच जर तुम्ही खाली वाकलेले असाल तर त्या स्थितीत तुमचे शरीर कधीही वळवू नका. मात्र ३ ते ४ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर शक्यतो वाकणे टाळा.

स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्वाचे

साधारणपणे नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणात स्वत:ची काळजी घेण्यासाठी जी ऊर्जा खर्च करावी, ती कार्यालयीन कामावर खर्च होते. याशिवाय गरोदरपणात मूड स्विंग्स खूप सामान्य आहेत. त्याशिवाय ऑफिसमध्ये कामाच्या दबावामुळे महिला खूप तणावग्रस्त होतात. त्यामुळे बाळ आणि आई दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपले काम व्यवस्थापित करण्यास शिका. तुमच्यावर खूप दबाव येत असेल किंवा वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून तुमच्यावर कोणत्याही कारणाने दबाव येत असेल, तर तुम्ही याबाबत एचआरशी बोलू शकता. प्रत्येक कार्यालयात गर्भवती महिलांसाठी काही विशिष्ट नियम असतात, ज्या अंतर्गत तुम्हाला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. जर तुम्हाला मदत हवी असेल तर तुमच्या सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून मदत मागायला कधीही संकोच करू नका. कामाच्या वेळेत, ऑफिसमध्ये थोडा वेळ काढा आणि जागेवर बसून डोळे मिटून ब्रीदिंग एक्सरसाइज आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा.

थकल्यासारखे वाटत असल्यास विश्रांती घ्या

गरोदरपणात सामान्य दिवसांपेक्षा काम करताना लवकर थकवा येतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी आणि तुमच्या जीवनशैलीतील इतर सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लोह आणि प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता होत नाही आणि ऊर्जा टिकून राहते. जास्त वेळ बसून काम करू नका. ठराविक कालावधीनंतर लहान ब्रेक घेणे सुरू ठेवा. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे सर्वात महत्वाचे आहे. नेहमी आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि दिवसभर नियमित अंतराने आपल्या शरीराला द्रव द्या. जेणेकरून ते तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करेल आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel