National Red Wine Day: कशी बनते रेड वाइन, तुम्हाला माहिती आहेत का त्याचे फायदे-national red wine day 2024 how red wine is made and its advantages and disadvantages ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Red Wine Day: कशी बनते रेड वाइन, तुम्हाला माहिती आहेत का त्याचे फायदे

National Red Wine Day: कशी बनते रेड वाइन, तुम्हाला माहिती आहेत का त्याचे फायदे

Aug 28, 2024 09:11 AM IST

The process of making red wine: २८ ऑगस्ट हा 'राष्ट्रीय रेड वाइन दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. अर्थात वाईन हा अल्कोहोलयुक्त पदार्थ आहे पण इतर मद्यांपेक्षा तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो.

कशी बनते रेड वाईन
कशी बनते रेड वाईन (pixabay )

How red wine is made: ड्रिंकचे अनेक प्रकार आहेत. बिअर, व्हिस्की, वोडका, शॅम्पेन आणि वाइन. यापैकी वाइन सर्वात खास मानली जाते. त्याला लक्झरी अल्कोहोल देखील म्हटले जाऊ शकते. सहसा वाइन द्राक्षापासून बनवले जाते. ती बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे साजरे करण्यासाठी, २८ ऑगस्ट हा 'राष्ट्रीय रेड वाइन दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. अर्थात वाईन हा अल्कोहोलयुक्त पदार्थ आहे पण इतर मद्यांपेक्षा तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. हे लक्षात घेऊन शूमेकर-गॅलोवेने २०१४ मध्ये रेड वाईन डे साजरा करण्यास सुरुवात केली.

या कालावधीत दिवस साजरा करण्याचे आणखी एक कारण म्हणजे ही द्राक्षे पिकण्याची वेळ आहे. यानंतर शरद ऋतूही सुरू होतो. अशा परिस्थितीत वाईन बनवण्याची तयारीही याच वेळेपासून सुरू होते. त्यामुळे यादरम्यान हा दिवस साजरा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत वाईनच्या एका बाटलीत किती द्राक्षे वापरली जातात आणि वाइन कशी बनवली जाते. शिवाय त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत.

रेड वाइनच्या एका बाटलीसाठी किती द्राक्षे वापरली जातात?

सांगायचं झालं तर, वाइनचे अनेक प्रकार आहेत, परंतु या सर्वांमध्ये रेड वाईन सर्वात विलासी मानली जाते. ही रेड वाईन द्राक्षापासून बनवली जाते. लाल आणि काळ्या द्राक्षांपासून सर्वोत्तम वाइन तयार केली जाते. वाइनची एक बाटली तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्षांची संख्या बाटलीच्या आकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर बाटली ७५ मिलीलीटरची असेल, तर इतकी वाइन बनवण्यासाठी जवळपास १ किलो द्राक्षे लागतात. हे प्रमाणदेखील द्राक्षांचा आकार आणि त्यात असलेला रस यावर ठरवले जाते. अर्थातच बाटली आणि द्राक्षांची साईज या दोघांवर हे ठरते.

कशी बनते वाइन?

द्राक्षांपासून वाइन बनवण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. वाइन बनवण्याचे काम सात टप्प्यात होते. सर्वप्रथम, वाइन बनवण्यासाठी चांगल्या प्रतीची द्राक्षे तोडून आणली जातात. यानंतर त्याचा यंत्राद्वारे दाबून रस काढला जातो. द्राक्षातून रस निघाला की तो आंबायला अर्थातच फर्मन्ट करायला ठेवला जातो. यासाठी लोक मोठे लाकडी डबे वापरतात. काही लोक बॅरल देखील वापरतात. द्राक्षांचा रस आंबला की तो रस स्वच्छ करून काढावा लागतो. त्यानंतर ते बाटल्यांमध्ये भरून विक्रीसाठी तयार केले जाते. कंपनीच्या स्वरूपानुसार, वाईनच्या प्रत्येक बाटलीसाठी तीन किलो द्राक्षे वापरली जातात.

रेड वाइनचे फायदे-

-रेड वाइनमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट रक्तदाब कमी करण्यास, रक्तवाहिन्या अधिक लवचिक बनविण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

-काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, रेड वाइन मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते आणि स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर सारख्या रोगांचा धोका कमी करू शकतो.

-रेड वाइनमधील काही संयुगे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण प्रदान करू शकतात.

रेड वाइनचे तोटे-

-रेड वाईनमध्ये अल्कोहोल असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने यकृताचे आजार, कर्करोग, हृदयविकार आणि अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

-रेड वाईनचे नियमित सेवन केल्याने व्यसन लागू शकते.

-मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताचा धोका वाढतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग