मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Pistachio Day 2024: दररोज पिस्ता खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे, एका दिवसात किती खावे?

National Pistachio Day 2024: दररोज पिस्ता खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे, एका दिवसात किती खावे?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 26, 2024 09:58 AM IST

Pistachio Benefits: ड्राय फ्रूट्समधील पिस्ता हे त्याची चव आणि पौष्टिक गुणांमुळे आपल्या डेली डायटचा एक साथीदार आहे. आज राष्ट्रीय पिस्ता दिनानिमित्त जाणून घ्या त्याचे फायदे आणि दिवसात किती खावे.

रोज पिस्ता खाण्याचे फायदे
रोज पिस्ता खाण्याचे फायदे (unsplash)

Benefits of Eating Pistachios Daily: पिस्त्यात भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. हे व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -६, जस्त आणि तांबे यासारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे. पोषक तत्वांनी समृद्ध पिस्ताचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पिस्ता दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घ्या रोज पिस्ता खाण्याचे फायदे आणि ते दिवसात किती खावे.

पिस्ता खाण्याचे फायदे (benefits of eating Pistachios)

चांगल्या दर्जाचे प्रथिने

पिस्तामध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड आणि ब्रँच्ड चेन अमिनो ॲसिड असतात. हे स्नायू सुधारण्यास मदत करते.

मधुमेहासाठी उपयुक्त

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्ता फायदेशीर ठरू शकतात. त्यात लो-ग्लायसेमिक इंडेक्स आहे, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर

पिस्त्यात असलेले टोकोफेरॉल रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करू शकते. पिस्ता खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

फायबरने समृद्ध

उच्च दर्जाच्या प्रथिनांच्या व्यतिरिक्त पिस्तामध्ये भरपूर फायबर देखील असते. हे तृप्ति वाढवतात, जे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

फक्त आरोग्यच नाही तर पिस्ता सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. पिस्तामध्ये व्हिटॅमिन ई असते. हे त्वचा आणि केसांचा कोरडेपणा कमी करू शकते. दररोज पिस्ता खाल्ल्याने केस आणि त्वचेला फायदा होतो.

एका दिवसात किती पिस्ता खावेत? (how many pistachios can eat in a day)

नमकीन रोस्टेड पिस्ता खूप टेस्टी लागतात. काही लोक भाजलेले पिस्ता खातात, तर काही लोक ते भिजवून खातात. पण हे जास्त खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात १५-२० ग्रॅम पिस्ता खावेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)