Parent's Day Wishes: पॅरेंट्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आई-वडिलांना पाठवा हे खास संदेश!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parent's Day Wishes: पॅरेंट्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आई-वडिलांना पाठवा हे खास संदेश!

Parent's Day Wishes: पॅरेंट्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आई-वडिलांना पाठवा हे खास संदेश!

Jul 26, 2024 02:12 PM IST

National Parent's Day 2024: जगात अनेक नाती असली तरी आई-वडिलांसोबतचं नातं सर्वात मौल्यवान असतं. ज्यात भरपूर प्रेम आणि आदर असतो. रविवारी साजरा होणाऱ्या पालक दिनानिमित्त पालकांना हे अप्रतिम संदेश पाठवा.

राष्ट्रीय पालक दिन शुभेच्छा संदेश
राष्ट्रीय पालक दिन शुभेच्छा संदेश (freepik)

Happy Parent's Day Wishes and Messages: दरवर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय पालक दिन (national parents day) साजरा केला जातो. यंदा हा दिवस २८ जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. जगात अनेक नाती असली तरी आई-वडिलांशी असलेलं नातं वेगळं आणि खास असतं. या नात्यात खूप प्रेम आणि आदर असतो. प्रत्येक दिवस पालकांचा असला तरी त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी एक दिवस त्यांना समर्पित केला जातो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पालकांचा दिवस आणखी खास करायचा असेल तर प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही पालकांना हे संदेश पाठवू शकता.

 

राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छा संदेश 

आईची ती प्रेमळ माया,

बाबांची ती वटवृक्षाची छाया

देवाने घडविली

ही अजब किमया

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आई घराचं मांगल्य असते,

तर बाप घराचं अस्तित्व असतो

आईकडे अश्रुचे पाट असतात

बापाकडे संयमाचे घाट असतात

ठेच लागली की आईची आठवण येते

मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही

आईपेक्षा मोठं जग कोणतंच नाही...

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मनातलं ओळखणारी आई,

भविष्य ओळखणारा बाप,

हे पाल्याचे एकमेव ज्योतिष असतात

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

वेळ बदलते, काळ बदलतो

परिस्थिती बदलते, माणसं बदलतात

पण आईवडिलांचं प्रेम कधीच बदलत नाही

कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

देवाची पूजा करून आई-बाबा मिळवता येत नाहीत

पण आई- बाबांची पूजा करून देवाची कृपा नक्कीच मिळवता येते...

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

निस्वार्थ प्रेम आणि त्याग

याचे एकतर्फी वचन पाळून

मुलांचे सुयोग्य संगोपणन करणाऱ्या सर्व पालकांना

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते

तिला आई म्हणतात

पण डोळ्यात प्रेम न दाखवता

जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा

अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे

अशा माझ्या पालकांना

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई वडिलांचं प्रेम हे समुद्राप्रमाणे असतं

त्याची सुरुवात तुम्हाला पाहता येते

मात्र त्याचा शेवट कधीही दिसत नाही

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पैशाने सर्व काही मिळवता येईल

मिळणार नाही ती केवळ

आईच्या रुपात प्रेमळ माऊली

अन् बाबांच्या रुपात प्रेमाची सावली

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Whats_app_banner